विजेच्या धक्क्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:16+5:302021-07-28T04:09:16+5:30
काेंढाळी : इमारतीच्या पहिल्या माळ्यावर काम करीत असतानाच बांधकाम कामगाराचा घरावरून गेलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्याला विजेचा ...

विजेच्या धक्क्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू
काेंढाळी : इमारतीच्या पहिल्या माळ्यावर काम करीत असतानाच बांधकाम कामगाराचा घरावरून गेलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्याला विजेचा जाेरात धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे मंगळवारी (दि. २७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मन्साराम फुसू धुर्वे (४०, रा. मदनी, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. तो कमलेश यादव, रा. बाजारगाव यांच्या घराच्या बांधकामावर कामगार म्हणून काम करीत हाेता. त्यांच्या घरावरून विजेच्या ११ केव्ही क्षमतेच्या तारा गेल्या आहेत. सेंट्रिंगची पाटी उचलून हाताळत असताना त्या पाटीचा घरावरील विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला लगेच नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.