सिंधू आर्ट गॅलरीचे निर्माणकार्य थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:16+5:302021-02-08T04:08:16+5:30

- शासनदरबारी अडकली फाईल : स्वप्नपूर्तीची प्रतीक्षाच धीरज शुक्ला/लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात बनणाऱ्या देशातील सर्वात मोठी सिंधू ...

Construction of Sindhu Art Gallery cooled down | सिंधू आर्ट गॅलरीचे निर्माणकार्य थंडावले

सिंधू आर्ट गॅलरीचे निर्माणकार्य थंडावले

- शासनदरबारी अडकली फाईल : स्वप्नपूर्तीची प्रतीक्षाच

धीरज शुक्ला/लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात बनणाऱ्या देशातील सर्वात मोठी सिंधू आर्ट गॅलरीचे निर्माणकार्य थंडावले आहे. शासनदरबारी या कामाची फाईल अडकली आहे. सिंधू संस्कृती व सभ्यतेची ओळख भावी पिढीला होण्याच्या हेतूने साकारल्या जाणाऱ्या या आर्ट गॅलरीचे काम निधीअभावी सुरूच झाले नसल्याने सिंधी समाजात निराशा पसरली आहे. या आर्ट गॅलरीचे निर्माणकार्य लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे.

भारतीय सिंधू सभा आणि सिंधी समाजाच्या अन्य संघटनांच्या प्रयत्नाने वर्ष २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधू आर्ट गॅलरीच्या निर्माणाची घोषणा जरीपटका येथील दयानंद पार्क येथे पार पडलेल्या चेट्रीचंड महोत्सवात केली होती. ११९ कोटी रुपये खर्चातून जवळपास १ लाख ९० हजार चौरस फूट जागेवर ही आर्ट गॅलरी साकारली जाणार होती. त्यानंतर जागाही निश्चित करण्यात आली. मौजा इंदोरा येथे जागा निवडण्यात आली. त्यानंतर भारतीय सिंधू सभेच्या पदाधिकाऱ्यांनी वास्तूविद व अभियंत्यांसोबत २६ ऑगस्ट २०१८ रोजी बैठकीतून प्रकल्पाची आखणी केली होती. प्रकल्पाची फाईल एनआयटीकडे पाठविण्यात आली. फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलपर्यंत पोहोचत नाही तोवर सत्तापरिवर्तन झाले होते. तेव्हापासून ही फाईल शासनदरबारी अडकली आहे. भारतीय सिंधू सभेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतरही बरेच प्रयत्न केले. परंतु, त्यावर शासनाकडून ठोस भूमिकेचा अभावच दिसून आला.

सभ्यतेची मुलांना झाली असती ओळख

देशभरातील लोक येथे येऊन सिंधू घाटी सभ्यतेचे दर्शन करू शकतील, अशा स्वरूपाची ही आर्ट गॅलरी होणार होती. यासाठी मोहंजोदारो येथील अवशेष येथे प्रदर्शित केले जाणार होते. शिवाय, सिंधू दर्शनाचे पुरावेही लोकांना बघता, वाचता आली असती. तसेच सिंधी गीत आणि नृत्य छेजची ओळख व शिकण्याची इच्छा नव्या पिढीला झाली असती.

चेट्रीचंड महोत्सवात झाले प्रयत्न

दयानंद पार्कमध्ये भगवान झुलेलाल जयंतीच्या पर्वावर चेट्रीचंड महोत्सवात सिंधू घाटी सभ्यतेची ओळख करवून देणारे प्रदर्शन भरविले जाते. २०१९ मध्ये प्रथमच डिजिटल सिंधू आर्ट गॅलरीचे निर्माण करण्यात आले होते. यात व्हिडिओच्या माध्यमातून सिंधू घाटीच्या सभ्यतेचे दर्शन घडविण्यात आले. २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे महोत्सवाचे आयोजन झाले नाही. स्थायी सिंधू आर्ट गॅलरीमुळे समाजबांधवांसह सर्व देशवासीयांना भारताच्या स्वर्णिम इतिहासाची ओळख होईल, अशी अपेक्षा आहे.

आर्ट गॅलरीची अशी आहे योजना

- ६०० लोकांच्या क्षमतेचा सभागृह.

- १०० ते १५० लोकांच्या क्षमतेची ऑडिओ-व्हिडिओ रूम.

- रेस्टेराँ.

- म्युझिक आणि आर्ट गॅलरी.

- ॲडमिन ब्लॉक.

- दोन ते चार हजार लोकांच्या क्षमतेचा बहुउपयोगी सभागृह.

- ५० खोल्यांचा गेस्ट हाऊस.

- लॉन.

- इष्टदेव भगवान झुलेलालजींचे मंदिर.

- पीएचडी शोध सेंटर.

- लाईट आणि साऊंड शो.

- सिंधी लायब्ररी.

- सिंधी म्युझिक क्लास.

- सिंधी डान्स क्लास.

...

Web Title: Construction of Sindhu Art Gallery cooled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.