श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:49+5:302021-01-17T04:08:49+5:30
कन्हान : येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व गृहसंपर्क अभियान समितीच्यावतीने निधी संकलन अभियानाला शुक्रवारी प्रारंभ झाला. तारसा रोड ...

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण
कन्हान : येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व गृहसंपर्क अभियान समितीच्यावतीने निधी संकलन अभियानाला शुक्रवारी प्रारंभ झाला.
तारसा रोड येथे निधी संकलन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला ग्रीनर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन नायडू, प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख उल्हास इटनकर, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अभियान प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे राजेश पिल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात कारसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने योगेश वाडीभस्मे, अविनाश कांबळे, खंडारे, राजेंद्र बेले यांचा समावेश होता. याप्रसंगी अंकित दिवटे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रामभाऊ दिवटे यांनी राम जन्मभूमी मंदिर बांधकामाकरिता ११ हजारांचा धनादेश समितीच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाला कन्हान नगरीचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे, माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते राजेंद्र शेंद्रे, जयराम मेहरकुळे, हिरालाल गुप्ता, मूलचंद शिंदेकर,अमिश रुंघे, लीलाधर बर्वे, रिंकेश चवरे, शैलेश शेळके, नगरसेवक सुषमा चोपकर, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील यांची उपस्थिती होती. संचालन सौरभ पोटभरे यांनी केले. आभार अतुल हजारे यांनी मानले.