महामार्गांचे बांधकाम कमी खर्चात व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST2021-05-28T04:06:58+5:302021-05-28T04:06:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महामार्गांच्या बांधकामात स्टील व सिमेंटमुळे खर्च वाढतो. त्यामुळे या दोघांना पर्याय निर्माण करण्याचा आपला ...

Construction of highways should be done at low cost | महामार्गांचे बांधकाम कमी खर्चात व्हावे

महामार्गांचे बांधकाम कमी खर्चात व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महामार्गांच्या बांधकामात स्टील व सिमेंटमुळे खर्च वाढतो. त्यामुळे या दोघांना पर्याय निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असून भविष्यात कमी खर्चात महामार्गांचे बांधकाम करणे ही आज देशाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. आयआयटी-तिरुपतीतर्फे आयोजित ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ते बोलत होते.

आर्थिक वर्षात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १३ हजारांपेक्षा अधिक किमीचे महामार्गाचे बांधकाम केले आहे. येत्या पाच वर्षांत ६० हजार किमी महामार्गांच्या बांधकामाचे आपले उद्दिष्ट आहे. निरुपयोगी प्लास्टिक, रबर, स्टील फायबर, ज्यूट, क्वॉयर आदींचा रस्ते-महामार्ग बांधकामात वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण आहे. भारतात दरवर्षी बांधकामाचा १०० मिलियन टन मलबा तयार होतो. त्याचा उपयोगदेखील महामार्ग बांधकामात होऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

महामार्गाचे बांधकाम करताना लागणारी माती, रेती, मुरूम काढण्यासाठी होणारे खड्डे हे जलसंधारणासाठी उपयुक्त ठरले आहेत. महाराष्ट्रात बुलडाणा पॅटर्न या नावाने जलसंधारणाची ही योजना प्रसिद्ध आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव महामार्ग मंत्रालयाने राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना दिला आहे. राज्याचे रस्ते बांधकाम करताना जलसंधारणाचे काम व्हावे हाच उद्देश त्यात आहे. रस्त्यांचे बांधकाम करताना ८ टक्के उपयोगी नसलेल्या प्लास्टिकचा वापर डांबरी रस्त्यांमध्ये करण्याबाबत महामार्ग मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

रस्ते बांधकामाचा खर्च अधिक कमी कसा करता येईल, यावर आयआयटीने संशोधन करावे. परदेशात वापरण्यात येणारी नवीन संशोधित पद्धती आपण स्वीकारली पाहिजे. महामार्ग बांधकाम करताना वृक्षारोपण होत नाही. वृक्षारोपण व्हावे म्हणून वेगळे धोरण आहे. वृक्षारोपण योग्य पद्धतीनेच व्हावे. पर्यावरणाचे संतुलन आणि प्रदूषण रोखण्यासाठी हे आवश्यक आहे, असेदेखील गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Construction of highways should be done at low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.