शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात या ठिकाणी सुरू आहे देशातील पहिल्या चारस्तरीय वाहतूक व्यवस्थेची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 20:38 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम आणि सध्याच्या रेल्वे लाईनवर मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाला महामेट्रोने सुरुवात केली आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चारस्तरीय बांधकाम केल्या जात आहे.

ठळक मुद्देमेट्रो रेल्वे प्रकल्प : वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम आणि सध्याच्या रेल्वे लाईनवर मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाला महामेट्रोने सुरुवात केली आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चारस्तरीय बांधकाम केल्या जात आहे.मध्य रेल्वेने गड्डीगोदाम येथील रेल्वेच्या जमिनीवर निर्माणकार्याकरिता परवानगी दिली असून पायलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रस्तावित डबल डेकर स्ट्रक्चर कामठी मार्ग, गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळील रेल्वे लाईनला क्रॉस करणार आहे. कार्य अतिशय कठीण असून सतत व्यस्त अशा रेल्वेलाईनच्या गड्डीगोदाम येथील आरयूबी येथे करण्यात येत आहे.गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत चारस्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (आरयूबी मार्ग), दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माणकार्य पूर्ण झाल्यावर तिसºया आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील. कामठी मार्गाच्या दोन्ही बाजूला कॉलेज, व्यापारी संकुल, बँक, शासकीय कार्यालये आहेत. हा मार्ग उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा प्रमुख आहे. रिझर्व्ह बँक, कस्तूरचंद पार्क, सीताबर्डी किल्ला असे प्रमुख ऐतिहासिक स्थळ आहेत.प्रस्तावित उड्डाणपूल आणि मेट्रो ट्रॅकला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजेच या दोन संरचनेचे निर्माणकार्य एका सिंगल पिलरवर होणार आहे. त्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच-२ अंतर्गत चारस्तरीय वाहतूक व्यवस्थेची रचना असून, सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनपर्यंत ७.३० किमी लांब आहे. यामध्ये झिरो माईल, कस्तूरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. याअंतर्गत ऑटोमोटिव्ह चौक ते गड्डीगोदामपर्यंत ५.३ किमीचा भाग डबल डेकर उड्डाणपुलाचा आहे. तिसऱ्या स्तरावरील उड्डाणपूल चार पदरी वाहतुकीकरिता राहणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहता १४०० मेट्रिक टन वजनाचे स्टील कम्पोझिट गर्डर रेल्वे ट्रॅकवर योग्य पद्धतीने ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर