एम्प्रेस मॉलचे बांधकाम अनधिकृत
By Admin | Updated: November 5, 2015 03:20 IST2015-11-05T03:20:22+5:302015-11-05T03:20:22+5:30
उपराजधानीतील सर्वसामान्य नागरिकांनी घराचे बांधकाम करताना नियमाचे थोडे उल्लंघन केले तरी महापालिका वा नासुप्रचा

एम्प्रेस मॉलचे बांधकाम अनधिकृत
पार्किंगच्या जागेत बांधली दुकाने : यथास्थिती कायम ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश
योगेंद्र शंभरकर ल्ल नागपूर
उपराजधानीतील सर्वसामान्य नागरिकांनी घराचे बांधकाम करताना नियमाचे थोडे उल्लंघन केले तरी महापालिका वा नासुप्रचा त्यावर बुलडोझर चालतो. परंतु शहरातील नामांकित एम्प्रेस मॉलच्या निर्मात्यांनी नगररचना विभागाची अनुमती न घेता हजारो चौरस फूट अनधिकृत बांधकाम केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १९ आॅगस्ट २०१५ ला अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविल्यानंतर मॉलने अनधिकृत बांधकाम केल्याचे शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. पथकाने मॉलच्या पहिल्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम तोडण्याला सुरुवात केली. परंतु ‘लोकमत’ने यासंदर्भात इत्थंभूत माहिती गोळा केली असता, मॉलच्या निर्मात्यांनी एकाच मजल्यावर नव्हे तर हजारो चौरस फूट अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. नाव मोठे पण लक्षण खोटे, यानुसार अशा कंपन्या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे धक्कादायक सत्य यानिमित्ताने शहरातील नागरिकांना माहीत झाले आहे.
मॉल व्यवस्थापनाने एम्प्रेस मिलच्या पाच भूखंडाची खरेदी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, महापालिका क्षेत्रात ५ हजार चौरस मीटरहून अधिक बांधकाम करावयाचे झाल्यास झोन कार्यालयाऐवजी नगररचना विभागाकडून बांधकामाचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो. परंतु व्यवस्थापनाने प्रत्येक भूखंडावर अनधिकृत बांधकाम के ले आहे.
भूखंड क्रमांक ५ येथील एम्प्रेस मॉलच्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पार्किंग दर्शवून बांधकामाला मंजुरी घेतली होती. परंतु या मजल्यावर ११,२५७ चौरस मीटर भागात व्यावसायिक संकुलाचे बांधकाम करून दुकान गाळे काढले आहेत.
या भूखंडाच्या मागील बाजूच्या ले-आऊ टमध्ये रस्त्याच्या जागेवर १४३३.६० चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे.