शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्वा लाईन मार्गावर सातवे बन्सीनगर स्टेशन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:51 IST

अ‍ॅक्वा लाईन मार्गावर बन्सीनगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. या मार्गावर हे सातव्या क्रमांकाचे स्टेशन आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगरदरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत.

ठळक मुद्दे प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज : आधुनिक सोईसुविधांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्वा लाईन मार्गावर बन्सीनगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. या मार्गावर हे सातव्या क्रमांकाचे स्टेशन आहे.सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगरदरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. लोकमान्य नगर, बन्सीनगर, वासुदेवनगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर,अंबाझरी लेक व्ह्यू, एलएडी स्क्वेअर, शंकरनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी इंटरचेंज अशी या सर्व स्टेशनची नावे आहेत.कोरोनामुळे सध्या मेट्रो सेवा थांबली असली तरीही या ११ स्थानकांपैकी लोकमान्य नगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशनवरून प्रवासी वाहतूक पूर्वीच सुरू झाली आहे.स्टेशनलगतच्या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. गेल्या काही वर्षात हिंगणा मार्गाच्या दोन्हीही बाजूला रहिवासी संकुलांची मोठ्या प्रमाणात भर पडल्याने या भागातील लोकसंख्या वाढली आहे. यामुळे या मार्गावर नोकरी, शिक्षण किंवा उद्योगाच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्या तसेच येथील रहिवाशांना या स्टेशनचा नक्कीच फायदा मिळणार आहे.बन्सीनगर स्टेशनची उभारणी ५८० वर्ग मीटरमध्ये असून दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनाची व्यवस्था आहे. ग्राऊंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अशा तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काऊंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. स्टेशनवर आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंटमध्ये अग्निशामक टँंक, छतावर सौर पॅनेलची व्यवस्था असून सौर पॅनेल निर्मित वीज थेट ग्रीडमध्ये येणार असल्याने ऑपरेशन खर्च कमी होणार आहे. याशिवाय ग्रीन बिल्डिंगच्या नियमांनुसार बायो डायजेस्टरने सुसज्ज, स्टेशनच्या दोन्ही बाजूने पायऱ्या, एस्केलेटरमुळे ग्राऊंड फ्लोअर ते कॉनकोर्स आणि कॉनकोर्स ते प्लॅटफॉर्मदरम्यान चढणे किंवा उतरणे सहज शक्य, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरिता तरतूद, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था, लहान मुलांच्या देखरेखीकरिता स्वतंत्र खोली (बेबी केअर रूम), कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, संपूर्ण स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी आदी वैशिष्ट्ये आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर