शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:58 AM

नागपूर महालिकेच्यावतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.

ठळक मुद्दे२३ लाखांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महालिकेच्यावतीने संविधान चौकात उभारण्यात येणार असलेल्या संविधान उद्देशिका शिलालेख कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.याप्रसंगी आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ.डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक अमर बागडे, किशोर जिचकार, जितेंद्र घोडेस्वार, राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे सचिव शिवदास वासे, धर्मेश फुसाटे, संविधान फाऊंडेशनचे प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, बबली मेश्राम उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. शिलालेखासाठी संदीप जाधव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. मनपाने संविधान उद्देशिका शिलालेखासाठी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. शिलालेखाची उंची सुमारे १८ ते २० फू ट राहणार असून या स्मारकाचे बांधकाम पिवळ्या व लाल सॅन्डस्टोनने करण्यात येईल. यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पॉलीमार्बल दगडावर कोरलेली असेल. या स्मारकाची प्रतिकृती संसद भवनाप्रमाणे राहील. संविधाच्या प्रतिकृतीवर राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ असल्याची माहिती जाधव यांनी दिली. संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी तर आभार सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी मानले.

 

टॅग्स :RESERVE BANK Of India Square Nagpurरिझर्व्ह बँक चौक नागपूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर