राज्यघटनेने वाढविला ख्रिश्चनांचा जीवनस्तर

By Admin | Updated: March 2, 2017 02:41 IST2017-03-02T02:41:00+5:302017-03-02T02:41:00+5:30

पवित्र बायबल इतकाच भारतीय राज्यघटनेने ख्रिश्चनांचा जीवनस्तर वाढविला आहे. राज्य घटना सुंदर आणि पवित्र आहे,

The Constitution raises the standard of living of Christians | राज्यघटनेने वाढविला ख्रिश्चनांचा जीवनस्तर

राज्यघटनेने वाढविला ख्रिश्चनांचा जीवनस्तर

आर्चबिशप अब्राहम : ख्रिश्चन पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा
नागपूर : पवित्र बायबल इतकाच भारतीय राज्यघटनेने ख्रिश्चनांचा जीवनस्तर वाढविला आहे. राज्य घटना सुंदर आणि पवित्र आहे, असे मत आर्चबिशप रेव्हरंड अब्राहम वीरुथाकुलंगारा यांनी व्यक्त केले.
इंडियन कॅथॉलिक प्रेस असोसिएशन आणि नागपूर आर्चडायोसिसच्या संयुक्त विद्यमाने आर्चबिशप हाऊसमधील पास्टोरल सेंटरमध्ये २२ वा राष्ट्रीय ख्रिश्चन पत्रकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन करताना आर्चबिशप अब्राहम बोलत होते.
सध्याच्या काळातील दलित आणि अल्पसंख्यकांवरील अत्याचार आणि माध्यमांचा प्रतिसाद या विषयावर हा दोन दिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी फादर अ‍ॅम्ब्रोस पिंटो यांचे प्रमुख भाषण झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बौद्ध विचाराचे मुख्यालय, असा त्यांनी या भूमीचा उल्लेख करून नागपूरचे महत्त्व सांगितले. दलित पत्रकारांच्या अभावावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
डॉ.थ्रिटी पटेल, शानूर मिर्झा, डॉ. शोमा सेन, डॉ. तेजिंदरसिंग रावल, डॉ. युगल रायुलू, डॉ. जी. एस. ख्वाजा, डॉ. जॉन मेनाचेरी, डॉ. सुपंथा भट्टाचार्य, कास्टा डिप आणि इग्नेशियस गोन्सालव्हिस आदींनी विविध विषयांवर चर्चा केली.
मुंबईचे पत्रकार जेम्स इडॅयोडी, एम. जेन्गाईकुमार, फादर वर्गिस पॉल, इग्नेशियस गोन्सालव्हिस, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक राहुल अवसरे, चार्ल्स साळवे आणि सॅम्युएल गुनशेखरन यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)

 

Web Title: The Constitution raises the standard of living of Christians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.