रामटेक येथे संविधान दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:19+5:302020-11-28T04:07:19+5:30
रामटेक : शीतलवाडी ग्रामपंचायत येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात ...

रामटेक येथे संविधान दिन
रामटेक : शीतलवाडी ग्रामपंचायत येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच मदन सावरकर, उपसरपंच विनाेद सावरकर, सचिव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित हाेते.
....
भाजप अनुसूचित जाती आघाडी
कामठी : येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप अनुसूचित जाती आघाडी कामठी शहरतर्फे जयस्तंभ चौक येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया, उज्ज्वल रायबोले, लाला खंडेलवाल, सुनील खनवानी, मंगेश यादव, पुष्पराज मेश्राम, कमल यादव, नगरसेविका संध्या रायबोले, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, डॉ. महेश महाजन, ॲड. आशिष वंजारी, पंकज वर्मा, नीतू दुबे, विजय पाटील, रूपेश भुतांगे, विक्की बोंबले, कैलास मलिक, शंकर चवरे, राजकुमार हडोती, कपिल गायधने, अरविंद चवडे, सुनील चव्हाण, वसीम हैदरी, शैलेश रामटेके, शशिकला मैंद, प्रियंका चहांदे, सतीश जयस्वाल, अजय पांचोली, प्रमोद वर्णम, अमोल घडले, नरेश मोहबे आदी उपस्थित होते.
....
श्रावस्ती बुद्धविहार
गुमगाव : नजीकच्या वागदरा येथील श्रावस्ती बुद्धविहार येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वामन वाळके हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुसूदन चरपे, अरविंद वाळके, हंसदास वानखेडे, पंकज गोटे आदी उपस्थित होते. संविधान दिन लोकोत्सव होऊन त्यातून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही संवैधानिक मूल्ये जनमानसात रुजून राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन अरविंद वाळके यांनी केले. उदय खोब्रागडे, रोहित लिखार, राजकपूर धाबर्डे, कानू खोब्रागडे, मनुकला वाळके, वत्सला खोब्रागडे, कविता पाटील, श्रद्धा खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.