कन्हान येथे संविधान दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:34+5:302020-11-28T04:07:34+5:30

कन्हान : येथील विविध संघटनेतर्फे संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ...

Constitution Day excitement at Kanhan | कन्हान येथे संविधान दिन उत्साहात

कन्हान येथे संविधान दिन उत्साहात

कन्हान : येथील विविध संघटनेतर्फे संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विनायक वाघधरे, बाबू रंगारी, सतीश भसारकर, मनीष भिवगडे, ज्ञानेश्वर दारोडे, पंकज रामटेके, नितिन मेश्राम, महेश धोंगडे, दुर्गा निकोसे, माया चिमणकर, प्रमिला घोडेस्वार, उषा सांगोडे, मायाताई बेलेकर, आम्रपाली वानखेडे, शारदा वारके, नयना धनविजय, दुर्गा गजभिये आदी उपस्थित होते.

.....

जि. प. हायस्कूल जवळी

भिवापूर : संविधान दिनानिमित्त जवळी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्र प्रमुख निरंजन माटे, मुख्याध्यापिका अनिता ठाकरे, संजय बावनकुळे, मीनाक्षी बिरादर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भारतीय संविधानावर प्रकाश टाकला. वीरखंडी धापर्ला ग्रामपंचायत येथेही संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सचिन ठवकर, मंगला सहारे, विजय हिंगे, सचिन धनविजय, मंगला धनविजय, कल्पना ठवकर, जयदेव सोनटक्के, जयश्री गोंगल आदी उपस्थित होते.

....

काटाेलमध्ये संविधान दिन उत्साहात

काटोल : तालुक्यात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डाॅ. आंबडेकर चौक येथे महामानवाच्या पुतळ्यास माल्यार्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. नगर परिषद सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, शिक्षण सभापती देवीदास कठाणे, जितू तुपकर, किशोर गाढवे, संदीप वंजारी, राजू चरडे व कर्मचारी उपस्थित होते. विश्वव्यापी संस्थेद्वारे पारडसिंगा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघटनेचे ज्येष्ठ वक्ते तानबा सिंघारे हाेते. यावेळी शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाडे, मनोज बोरकर, आकाश बेहनिया, राजू गाढवे, चेतन आमले उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे वाचन केल्यानंतर जागर संविधान उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Constitution Day excitement at Kanhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.