शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

राजकीय शत्रूंचा माझी बदनामी करण्याचा कट :  अशोक धवड यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 9:05 PM

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याशी आपला काहीच संबंध नाही. या प्रकरणात आपल्याला फसविण्यात आले आहे. राजकीय शत्रू याचा फायदा घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. माझी सर्वत्र बदनामी करण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी केला आहे.

ठळक मुद्देनवोदय बँक प्रकरणात फसविल्याचा दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याशी आपला काहीच संबंध नाही. या प्रकरणात आपल्याला फसविण्यात आले आहे. राजकीय शत्रू याचा फायदा घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. माझी सर्वत्र बदनामी करण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी केला आहे.मी फरार असतानाही नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो अशा बातम्या २६ आॅक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आल्या. काहींनी पोलीस आपला शोध घेत आहे व आपल्याला अटक करण्यासाठी वॉरन्ट जारी करण्यात आला आहे असेही लिहिले. वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे. मी आपल्या घरीच राहात आहे. सर्वांना घराचा पत्ता माहिती आहे. परंतु, बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी एकानेही घरी येऊन किंवा फोन करून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केले नाही आणि पोलिसांचे मतदेखील जाणून घेतले नाही. त्यामुळे यामागे केवळ माझी व आमदार राऊत यांची बदनामी करण्याचा हेतू होता हे दिसून येते.मला फरार आरोपी म्हणणे हा सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने मला अटकेपासून संरक्षण दिले आहे. परिणामी, चुकीच्या बातम्या प्रकाशित करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याचा सल्ला वकिलाने दिला होता. परंतु, न्यायालयात जायचे नसल्यामुळे केवळ सत्य परिस्थिती समाजापुढे यावी ही इच्छा आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असून न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला न्यायालयातून नक्कीच न्याय मिळेल असे धवड यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडbankबँकfraudधोकेबाजी