वेबसिरीज पाहून रचले षड्‌यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST2021-06-05T04:07:26+5:302021-06-05T04:07:26+5:30

डीसीपींनी घेतला होता एन्काउन्टरचा निर्णय बिल्डरच्या नातेवाइकांना ओलिस ठेवून खंडणी मागणारा आरोपी जितेंद्र बिसेन याला पकडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ...

Conspiracy after watching the webseries | वेबसिरीज पाहून रचले षड्‌यंत्र

वेबसिरीज पाहून रचले षड्‌यंत्र

डीसीपींनी घेतला होता एन्काउन्टरचा निर्णय

बिल्डरच्या नातेवाइकांना ओलिस ठेवून खंडणी मागणारा आरोपी जितेंद्र बिसेन याला पकडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी पोलिसांनी त्याला तीनदा दोन-दोन लाख रुपये दिले. आरोपी खिडकीतून हात बाहेर काढून पैसे घेत होता. पोलिसांनी त्याचे दोन्ही हात पकडण्याचे ठरविले होते. मात्र ते शक्य झाले नाही. स्थितीची गंभीरता लक्षात घेता उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वातील चमूने वेळ पडली तर आरोपीचे एन्काउन्टर करण्याचा निर्णय घेतला होता. राजमाने व एक अधिकारी त्याला पकडणार होते तर इतर तिघे गोळीबाराला उत्तर देण्यास सज्ज होते. राजमाने हे स्वत: पाच जणांच्या पोलीस चमूसह घराच्या मागील भागातून आत शिरले व तेथून ते तळमजल्यावर आले. दरवाजा बंद नसल्याने जितेंद्रला लगेच पकडण्यात यश आले. लगेच पोलिसांनी त्याची बंदूक व चाकू ताब्यात घेतले.

Web Title: Conspiracy after watching the webseries