मीटर तपासणीच्या नावावर कनेक्शनच कापले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:20+5:302021-02-13T04:09:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणतर्फे थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन कापण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. सोनेगाव येथील रहमत ...

मीटर तपासणीच्या नावावर कनेक्शनच कापले ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणतर्फे थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन कापण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. सोनेगाव येथील रहमत नगर येथे राहणाऱ्या अब्दुल अल्ताफ यांनाही अशाच कारवाईचा सामना करावा लागला. महावितरणचे कर्मचारी त्यांच्या घराचे वीज मीटर तपासणी करण्याच्या नावावर घेऊन
गेले. परंतु तपासणी केल्यानंतर मीटर परत केलेच नाही. उलट कनेक्शनच कापले. राज्य सरकारने कोरोना काळातील वीज बिलापासून दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु नंतर सरकारने यू-टर्न घेतला. याला विरोधही होतोय. या विरोधादरम्यानही महावितरणने सोमवारपासून थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. रोज २५० ते ३०० जणांचे कनेक्शन कापले जात आहे. रहमतनगर येथील रहिवासी अब्दुल अल्ताफ यांचेही बिल थकीत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या संकटात आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यामुळे ते वीज बिल भरू शकले नाहीत. यापूर्वी ते नियमित आपले बिल भरायचे. त्यांच्या घरात दोन मीटर आहेत. एका मीटरचे बिल ४९,४५० रुपये तर दुसऱ्या मीटरचे बिल १ लाख ४३ हजार ३०० रुपये इतके आले. शेख यांचे म्हणणे आहे त्यांना दोन ते अडीज हजार रुपये इतके बिल येत होते. अशा परिस्थितीत १० महिन्याचे बिल इतके आल्याने संशय येतो. त्यांचे म्हणणे आहे, सोमवारी त्यांच्या घरी महावितरणचे कर्मचारी आले. यावेळी त्यांनी मीटर खराब असल्याचा संशय व्यक्त केला. यावर महावितरणचे कर्मचारी वीज मीटर टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत घेऊन गेले. काही तासानंतर मीटर व्यवस्थित असल्याचे सांगत थकील बिल भरले तरच मीटर लागेल, असे सुनावले.
इतकी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्यावर त्यांना अर्धे बिल भरण्यास सांगितले. ग्राहकांकडे तितके पैसेही नव्हते. त्यामुळे बिल भरणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी कनेक्शन कापले.
ग्राहकाला अनेक महिन्यानंतर ६१ हजार रुपयांचे बिल पाठविण्यात आले होते. ते वाढून १ लाख ४३ हजार ३०० रुपये इतके झाले. वीज नसल्याने मुलांना मोठा त्रास होत आहे. ऑनलाईन अभ्यासातही अडचणी येत आहेत.
बॉक्स
मागणी केल्याने मीटर टेस्ट केले : महावितरण
महावितरणच्या काँग्रेसनगर डिव्हिझनचे कार्यकारी अभियंता ढोके यांनी सांगितले की, ग्राहकाने मागणी केल्यामुळे त्यांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. थकबाकी न भरल्यामुळे घरी लागलेले दोन्ही कनेक्शन कापण्यात आले. कारवाई नियमानुसारच केली. हप्त्याने थकबाकी भरण्याचा पर्याय देण्यात आला. परंतु ग्राहकाने तरीही रक्कम भरली नाही.