टेमसना ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:16+5:302021-02-16T04:10:16+5:30

कामठी : कामठी तालुक्यातील टेमसना-परसोडी-कुसुंबी गट ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने याहीवेळी सत्ता कायम ठेवली आहे. येथे सरपंचपदी अनिकेत ...

Congress's lead in Thamesna Gram Panchayat | टेमसना ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सरशी

टेमसना ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सरशी

कामठी : कामठी तालुक्यातील टेमसना-परसोडी-कुसुंबी गट ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने याहीवेळी सत्ता कायम ठेवली आहे. येथे सरपंचपदी अनिकेत पुरूषोत्तम शहाणे तर उपसरपंचपदी रामभाऊ मारोती खडसन यांची बिनविरोध निवड झाली आहे. जानेवारी महिन्यात टेमसना-परसोडी-कुसुंबी गट ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाचे ६ सदस्य तर कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच मनोहर कोरडे यांच्या किसान विकास पॅनलचे तीन सदस्य विजयी झाले होते. या निवडणुकीत भाजप समर्थित गटाला खातेही उघडता आले नाही. नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पुरूषोत्तम शहाणे यांनी माजी सरपंच मनोहर कोरडे यांना विश्वासात घेत सरपंचपदी अनिकेत पुरुषोत्तम शहाणे तर उपसरपंचपदी रामभाऊ मारोती खडसन बिनविरोध निवड केली. नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे पुरुषोत्तम शहाणे, अवंतिका लेकुरवाळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष दिनेश ढोले, पंचायत समिती सदस्य देविदास वंजारी यांनी अभिनंदन केले.

Web Title: Congress's lead in Thamesna Gram Panchayat