पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची गांधीगिरी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST2021-02-18T04:10:53+5:302021-02-18T04:10:53+5:30

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व दक्षिण नागपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मेडिकल चौक पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ...

Congress's Gandhigiri against petrol, diesel, gas price hike () | पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची गांधीगिरी ()

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची गांधीगिरी ()

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व दक्षिण नागपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मेडिकल चौक पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करून सर्व ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना गिरीश पांडव म्हणाले, केंद्र सरकारतर्फे सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. यावेळी माजी नगरसेवक योगेश तिवारी, नगरसेवक मनोज गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकारी, महिला काँग्रेस पदाधिकारी, दक्षिण नागपूर युवक काँग्रेस एनएसयुआय पदाधिकारी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Web Title: Congress's Gandhigiri against petrol, diesel, gas price hike ()