शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सरकारचे अपयश लपविण्यासाठी नागपुरात धार्मिक भावना भडकविली काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:11 IST

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा अहवाल सादर : समितीने अहवालात काय म्हटले ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील दंगलप्रकरणी प्रदेश काँग्रेसने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने आपला अहवाल बुधवारी प्रदेश काँग्रेसला दिला. मुस्लिम धर्मीयांना उद्रेकित करण्याच्या हेतूनेच धार्मिक भावना भडकविण्यात आली. राज्य सरकारच्या इशाऱ्यावरून विहिंप, बजरंग दल व भाजपने पूर्वनियोजित पद्धतीने हे घडवून आणले, असा आरोपवजा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली होती. ठाकरे यांच्यासह माजी खासदार हुसैन दलवाई यांनी दंगलग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा केली. यानंतर सत्यशोधन समितीने बुधवारी प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल सादर केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत विश्व हिंदू परिषद व बजरंग या संघटनांना पुढे करून आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामागे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी, धार्मिक ध्रुवीकरण व्हावे, असा हेतू होता, असा आरोप समितीने अहवालात केला आहे.

औरंगजेबाची कबर ३०० वर्षापेक्षा अधिक काळापासून या राज्यात आहे. या आधी कधीही हा मुद्दा नव्हता. मात्र, सरकारचे अपयश झाकण्यासाठी हा मुद्दा उकरून काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये सरकारमधील मंत्रीच करीत होते. पण त्यावर काहीच कारवाई होत नव्हती. मुस्लिमविरोधी ध्रुवीकरण करण्याच्या हेतूने हे सर्व केले जात होते. राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर या संघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यभर पडसाद उमटले. यावरून लक्ष वळविण्यासाठी औरंगजेबाविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर थेट मुस्लिम समाजाच्या आस्थेवरच हल्ला करण्यात आला, असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.

समितीने अहवालात काय म्हटले ?समितीने आपल्या अहवालात काँग्रेस पदाधिकारी ओ. एस. कादरी, अतुल लोंढे, जुल्फिकार अहमद भुट्टो, नितीन कुंभलकर, डॉ. अन्वर सिद्धीकी, कमलेश समर्थ, डॉ. मोहम्मद ओवेस हसन यांचे म्हणणे अहवालात नमूद केले आहे. दंगलीत दगडफेक करणारे युवक हे भालदारपुरा, महाल या भागातील नव्हते. विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी सौम्य स्वरूपाची कलमे लावण्यात आली. सत्यशोधन समितीला दंगलग्रस्त भागात भेट देण्याची परवानगी पोलिस आयुक्तांनी नाकारली.

उत्तर प्रदेश व गुजरातचा प्रयोगया घटनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, गुजरातच्या धर्तीवर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या माध्यमातून सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न झाला, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर