नाना पटोलेंच्या स्वागतासह आज काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 06:00 IST2021-02-10T06:00:00+5:302021-02-10T06:00:08+5:30
Nagpur news काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बुधवारी नागपुरात आगमन होत आहे. यानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत केले जाणार आहे.

नाना पटोलेंच्या स्वागतासह आज काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बुधवारी नागपुरात आगमन होत आहे. यानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत केले जाणार आहे. सूत्रानुसार नागपूर, भंडारा, गोंदियासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार असून काँग्रेसतर्फे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
स्वागताच्या तयारीसाठी मंगळवारी दिवसभर ब्लॉक स्तरावर बैठका झाल्या. पटोले यांचे सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. येथे त्यांचे जंगी स्वागत होईल. येथे मोठा मंचही तयार करण्यात आला आहे. यानंतर ते दीक्षाभूमी, गणेश टेकडी व ताजबाग येथे जाऊन दर्शन घेतील.