सेवाकार्यात काँग्रेसजनही होतात सहभागी

By Admin | Updated: February 9, 2015 01:00 IST2015-02-09T01:00:03+5:302015-02-09T01:00:03+5:30

‘विहिंप’कडे (विश्व हिंदू परिषद) केवळ आक्रमक व आंदोलन करणारी संघटना म्हणून पाहण्यात येते. परंतु परिषदेकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य चालतात. अनेकदा पक्षभेद विसरून लोक

Congressmen also participate in the service | सेवाकार्यात काँग्रेसजनही होतात सहभागी

सेवाकार्यात काँग्रेसजनही होतात सहभागी

मधुकर दीक्षित : विहिंपतर्फे ‘सेवाकुंभ-२०१५’चे आयोजन
नागपूर : ‘विहिंप’कडे (विश्व हिंदू परिषद) केवळ आक्रमक व आंदोलन करणारी संघटना म्हणून पाहण्यात येते. परंतु परिषदेकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य चालतात. अनेकदा पक्षभेद विसरून लोक त्यात सहभागी होतात. केरळमध्ये तर कॉंग्रेस व डाव्या पक्षांचे लोकदेखील आमच्या कार्यात सहभागी झाल्याची उदाहरणे आहेत, असे प्रतिपादन ‘विहिंप’चे केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय सहसेवाप्रमुख मधुकर दीक्षित यांनी केले. ‘विहिंप’च्या विदर्भ प्रांत सेवा विभागातर्फे सुवर्ण जयंतीनिमित्त विदर्भस्तरीय ‘सेवाकुंभ-२०१५’ चे आयोजन रविवारी रेशीमबाग परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ‘विहिंप’चे केंद्रीय मंत्री बाळकृष्ण नाईक, प्रशांत हरताळकर, उद्योजक रामरतन सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते १७ सेवाव्रतींचा सत्कार करण्यात आला. आज ‘विहिंप’तर्फे देशभरात ४४ अनाथाश्रम, ११२ छात्रावास, ३ महिलाश्रम, आरोग्यकेंद्र आदींद्वारे सेवाकार्य सुरू आहे. भारतात सेवाकायार्ची सुरुवात मिशनरींनी केली असा गैरसमज आहे. वास्तविक पाहता सेवा हा हिंदू जीवनपद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे असे दीक्षित म्हणाले. सनतकुमार गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, महिला विभागप्रमुख ममता चिंचवडकर, प्रांतमंत्री अजय निलदावार, अरुण नेटके उपस्थित होते.उदासा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी महिषासुरमर्दिनी स्तोत्र तर देवलापार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन भारती धर्माधिकारी व रविकिरण चर्जन यांनी केले. आभार गणेश काळकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
राममंदिरासाठी कटिबद्ध
अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी भावना प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त केली. मंदिर, श्रद्धा आणि संतांच्या रक्षणासाठी ‘विहिंप’ कटिबद्ध आहे. आजघडीला सात व्यक्तींमागे एक हिंदू असला तरी त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, असे ते म्हणाले.
सेवाव्रतींचा विशेष सत्कार
यावेळी चेतन उचितकर, संजय बंदेलवार, अर्चना डेहनकर, दुर्वांवती सरियाम, प्रज्ञा सोनटक्के, सावित्री बियाणी, दामोदरदास पारवानी, श्रीधर वैद्य, प्रफुल्ल पाडीया, रामरतन सारडा, अनिल मालवीय, प्रकाश छाबरिया, महेश झाडे, गोदावरी साठवणे, प्रभा सूर्यवंशी, राकेश कोरडीया, उर्मिला अग्रवाल या सेवाव्रतींचा विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Congressmen also participate in the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.