काँग्रेसच करणार सर्वसामान्यांचा विकास
By Admin | Updated: October 8, 2014 00:48 IST2014-10-08T00:48:06+5:302014-10-08T00:48:06+5:30
केंद्रात सरकारला केवळ १०० दिवसच झाले आहे. तरी भाजपा सर्वसामान्यांच्या हितेशी योजना राबविल्याचा दावा करीत आहे. भाजपाने ज्या योजना राबविल्या आहे, त्या काँग्रेस सरकारच्याच आहे.

काँग्रेसच करणार सर्वसामान्यांचा विकास
नागपूर : केंद्रात सरकारला केवळ १०० दिवसच झाले आहे. तरी भाजपा सर्वसामान्यांच्या हितेशी योजना राबविल्याचा दावा करीत आहे. भाजपाने ज्या योजना राबविल्या आहे, त्या काँग्रेस सरकारच्याच आहे. उलट काँग्रेस सरकारने या देशात कुणीही उपाशीपोटी झोपू नये याची जाणीव ठेवून अन्न सुरक्षा योजना, आरोग्यासाठी वाढलेला खर्च लक्षात घेता, राजीव गांधी जीवनदायी योजना या महत्त्वाच्या योजना राबविल्या आहे. या योजना श्रीमंतासाठी नाही तर गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी आहे. समाज हितेशी योजना राबविण्याचे कार्य केवळ काँग्रेसच करू शकते, असा विश्वास हिंगणा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार कुंदा राऊत यांनी व्यक्त केला.
हिंगणा मतदारसंघात पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. हिंगणा रायपूर जि.प. सर्कल मधील डिगडोह पांडे, सीताखैरी, गौरवाडा, गिदमगड, अडेगाव, मोहगाव ढोले, धानुली, कवळस, नवेगाव, देवळी पंढरी, काजळी, वडधामना, नागलवाडी या भागात फिरून, नागरिकांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केली, गावकऱ्यांसमोर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांशी बोलताना त्या म्हणाल्या की, हिंगणा विधानसभा क्षेत्रात गेल्या १५ वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार मिळाला नव्हता. काँग्रेसने यंदा युवा महिला उमेदवाराला संधी दिली आहे. हिंगण्याच्या विकासासाठी या संधीचे सोने करण्याचे आवाहन कुंदा राऊत यांनी केले.
पदयात्रेत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, बाबा आष्टणकर, गंगाधर काचोरे, अशोक पुनवटकर, श्यामबाबू, नरेंद्र पाटील, प्रमिला कुकडे, करुणा मोहड, संजय दलाल, विलास काचोरे, सतीश जयस्वाल, राजू काळबांडे, विजय पिसे, विठ्ठल दास, संदीप जयस्वाल, मिलिंद काचोरे, विनोद उमरेडकर, दिलीप काळबांडे, रवींद्र तिकडे, चंद्रभान धुर्वे, किशोर डुमरे, रोशन मडके, ईश्वर भेंडे, देवराव आटवार, कलावती ठाकरे, मोतीराम काळबांडे, सुधीर काळबांडे, रुपराव ठवरे, ज्ञानेश्वर वाळवे, भाऊराव देहारे, रामचंद्र टेकाडे, साहेबराव टेकाडे, प्रभाकर, न्याहारे, सतीश बावणे, वसंत न्याहारे, सुभाष गोहाणे, वसंतराव थोटे, विलास गोहाणे, चंदा फरकाडे, अंकुश कुरके, नत्थुजी सोनुर्ले, महादेव गोहाणे, रवींद गजभिये, प्रकाश देशमुख, सचिन सुके, सतीश वाडकर, गुणवंत नतराम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)