शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपुरात  भाजपाची तिरंगा यात्रा तर काँग्रेसची संविधान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:02 IST

गणराज्यदिनी भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. भाजपाने तिरंगा यात्रा काढत संविधानाला कुणीही बदलू शकत नसल्याचे सांगत काही घटक समाजात फूट पाडण्यासाठी अशा अफवा पसरवीत असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने संविधान बचाव रॅली काढत संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देगणराज्यदिनी राजकीय जुगलबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणराज्यदिनी भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. भाजपाने तिरंगा यात्रा काढत संविधानाला कुणीही बदलू शकत नसल्याचे सांगत काही घटक समाजात फूट पाडण्यासाठी अशा अफवा पसरवीत असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने संविधान बचाव रॅली काढत संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.भाजपातर्फे सकाळी १० वाजता टिळक पुतळा चौकापासून ते संविधान चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, राज्यमंत्री सुधाकर देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, डॉ. उपेंद्र कोठेकर, शिवानी दाणी, संजय फांजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ५०० फुटांचा तिरंगा लहरवीत आग्याराम देवी मंदिर, कॉटन मार्केट, व्हेरायटी चौक, झिरो माईल्समार्गे संविधान चौकात पोहोचले. येथे डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी कोहळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आज तिरंगा हा राष्ट्रध्वज आपल्या देशाची आन, बान व शान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशाला दिशा मिळाली आहे. हे संविधान कुणीही तोडू शकत नाही. मात्र, सत्तेची लालसा असलेले काही घटक काही सामाजाकि तत्त्वांशी हातमिळवणी करून अफवा पसरवीत आहेत. समाज तोडण्याचे काम करीत आहेत. भाजपाने सदैव एकता व अखंडतेचा पुरस्कार केला आहे. समाज जोडण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जमाल सिद्दीकी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सुधीर हिरडे, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, भोजराज डुंबे, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, कीर्तिदा अजमेरा, बंडू राऊत, किशन गावंडे, अब्दुल कदीर, नरेश जुमानी, वंदना यंगटवार, किशोर पलांदूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसतर्फे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. माजी मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते ‘संविधान बचाव’चे फलक घेऊन नारे देत व्हेरायटी चौकात पोहोचले. येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, काँग्रेसने नेहमी संविधानाचे पालन व संरक्षण केले आहे. काही घटक संविधान बदलण्याचा व लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी आपला लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा त्यांनी दिला.रॅलीमध्ये माजी आ. एस.क्यू. जमा, सुरेश भोयर, जयंत लुटे, बंडोपंत टेंभूर्णे, संदेश सिंगलकर, रमण पैगवार, रत्नाकर जयपूरकर, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, वासुदेव ढोके, रामगोविंद खोब्रागडे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, इर्शाद अली, अतिक कुरेशी, महेश श्रीवास, अजय नासरे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, मुक्तार अन्सारी, पंकज निघोट, रेखा बाराहाते, अंबादास गोंडाणे, अब्दुल शकील, संजय सरायकर, राजेश कुंभलकर, रवी गाडगे, मोंटी गडेचा, हाजी समीर, रिंकू जैन, विवेक निकोसे, दिनेश वाघमारे, आकाश तायवाडे, वैभव काळे, डॉ. प्रकाश ढगे आदींनी भाग घेतला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस