शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

"काँग्रेसने जातीवादावर मते मागितली" : चंद्रशेखर बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: June 6, 2024 18:26 IST

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप : संविधान बद्दलवणार असा अपप्रचार केला

नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जातीवादावर मते मागितली. इंडिया आघाडीकडून संविधान बदलवणार असा खोटा अपप्रचार करण्यात आला. जातीवाद राजनीती जिंकली. विकासाच्या राजनीतीचा पराभव झाला. भाजपने विकसित भारतासाठी मत मागितले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

बावनकुळे म्हणाले, आता सोयीचा निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडी ईव्हीएमवर बोलत नाही. हे खोटे बोलून मत घेतात. एकदा जनता भ्रमित झाली. नेहमी होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम केले. राज्यात घरकुल दिले, शेतकऱ्यांना सन्मान दिला, तरीही जनतेने काही क्षणासाठी दूर केले. महाविकास आघाडीने मुस्लिम, बौद्ध, आदिवासी समाजाला भीती दाखवण्याच काम केले. जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखवल्या. आपण केंद्रीय नेतृत्त्वाला विनंती केली आहे की त्यांनी फडणवीस यांना सरकारमध्ये ठेवावे. फडणवीस यांनी काम केले. मात्र, त्यांच्याबाबात गैरसमज पसरविले गेले. ते थोडे कमजोर झाले. एक निवडणूक हरल्याने काही फरक पडत नाही. फडणवीस यांचा राजीनामा वरिष्ठ नेतृत्व स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी देशाचे नेते आहेत. मतदानाचा टक्केवारीत आम्ही पुढे आहे, काही जागा कमी मतांनी हरलो, मागील वेळीच्या तुलनेत मत वाढले आहेत. महाविकास आघाडीचा विजय कपट कारस्थान शकुनी नितीने झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात महायुतीच्या २०० जागा निवडून येतील- शुक्रवारी दिल्ली येथे संसदीय मंडळाची बैठक आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वणवण फिरून काम केले. महायुतीच्या उमेदवादारासाठी आम्ही ताकदीने लढलो आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांबद्दल कुणीच संभ्रम करू नये. आम्ही तिन्ही पक्ष आत्मचिंतन करून त्यात सुधारणा करू. राज्यात महायुतीच्या पुन्हा २०० जागा निवडून येतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस