हुतात्मा दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेस सेवादलाने पाळला मौन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:56+5:302021-02-05T04:52:56+5:30

() लोकमत न्यूज नेटवर्क महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कॉंग्रेस सेवादलाच्यावतीने शनिवारी मौन दिन तथा शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ ...

The Congress Sevadal observed a day of silence on the occasion of Martyrs' Day | हुतात्मा दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेस सेवादलाने पाळला मौन दिन

हुतात्मा दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेस सेवादलाने पाळला मौन दिन

()

लोकमत न्यूज नेटवर्क

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कॉंग्रेस सेवादलाच्यावतीने शनिवारी मौन दिन तथा शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपवास दिन पाळला.

शहर कॉंंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण आगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जुनी शुक्रवारी येथील गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. अ.भा. कॉंग्रेस राष्ट्रीय सेवादल कमिटीचे सल्लागार कृष्णकुमार पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

प्रस्ताविक व संचालन महासचिव चिंतामण तिडके यांनी केले. प्रारंभी मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. कोषाध्यक्ष विजय वाटकर, प्रकाश जाधव, राजेंद्र भोंडे, प्रवीण आसरे, सुनील अग्रवाल, सतीश तलवारकर आदींनी मार्गदर्शन केले. शेतकरी दु:खी असल्यास देश सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन वक्त्यांनी केले. यावेळी अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते.

Web Title: The Congress Sevadal observed a day of silence on the occasion of Martyrs' Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.