काँग्रेसची नासुप्रवर धडक

By Admin | Updated: August 11, 2016 02:10 IST2016-08-11T02:10:47+5:302016-08-11T02:10:47+5:30

पूर्व नागपूर लगतच्या भागात नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

Congress rushes to Nupru | काँग्रेसची नासुप्रवर धडक

काँग्रेसची नासुप्रवर धडक

पूर्व नागपूरच्या समस्या सोडवा: शुल्क घेऊनही विकासकामे नाही
नागपूर : पूर्व नागपूर लगतच्या भागात नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नाही. यामुळे बुधवारी काँग्रेसतर्फे नासुप्र कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाक रे यांनी या आंदोलनात सहभागी होत नागरिकांच्या मूलभूत समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
पावसाळ्याला सुरुवात होताच पूर्व नागपुरात रस्त्यांची अवस्था बिकट होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर व वस्त्यात पाणी साचते. या भागात सिवेज लाईन व पावसाळी नाल्या टाकण्याची गरज आहे. नागरिकांनी विकास शुल्क भरूनही विकास कामे झालेली नाहीत. दुसरीकडे नासुप्रने विकास शुल्कात भरमसाट वाढ केली आहे.
यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी नासुप्रच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. नासुप्र सभापतींनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचे स्वरूप लक्षात घेता नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.
त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या तविरत लसोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.
पूर्व नागपुरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नासुप्रने विकास शुल्क प्रति चौरस फूट १२३ आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याला पूर्व नागपुरातील नागरिकांचा विरोध असल्याचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी सांगितले.
त्यानंतर एसएनडील कार्यालयावरही हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चात विनोद चकोले, अरुण कुथे, गुलाबराव हारोडे, रूपेश माकडे, नितीन बांते, प्रदीप शेंडे, अंकुश भोवते, जवाहर पटले, मोहन वाघाये, विजय तोमर, अशोक पारधी, शेंद्रे मामा, बंडू शेंद्रे, गनी खान, रमेश भालेकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: Congress rushes to Nupru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.