शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेवक कुकरेजा मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ फुटेज समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 11:57 IST

उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा पुरावा सादर केला.

ठळक मुद्देनागपूर पोलीस आरोपीला वाचवीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा हे आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते बाबू खान यांना मारहाण करीत असल्याचे व्हिडीओ फुटेज अखेर समोर आले. उत्तर नागपूरकाँग्रेस कमिटीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा पुरावा सादर केला.

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक अनिल नगरारे व ब्लॉक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगितले की, त्या दिवशीच्या घटनेचे काही व्हिडिओ फुटेज होते; परंतु नेमके मारहाणीचे फुटेज गायब होते. नगरसेविका नेहा निकासे यांच्या प्रयत्नाने अखेर मारहाणीचे फुटेजही समोर आले. या फुटेजमध्ये भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा, नगरसेवक महेंद्र धनवीज, भाजपचे उत्तर नागपूरचे मंडळ अध्यक्ष संजय चौधरी व इतर कार्यकर्ते बाबू खान यांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. हे पुरावे आम्ही पोलिसांना सादर करणार असून, त्यांनी इतरांचा शोध घ्यावा. खरे तर हे पुरावे पोलिसांनीच शोधून काढायला हवे होते; परंतु त्यांना हे पुरावे का सापडले नाहीत, हा प्रश्न आहे. पोलीस आयुक्त व पोलीस प्रशासन कुणाच्या दबावात काम करीत आहे, याचा खुलासाही त्यांनी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरोपीला वाचवीत असून, पोलीस त्यांच्या दबावात काम करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पत्रकार परिषदेला नगरसेविका नेहा निकोसे, रत्नाकर जयपूरकर, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी, गौतम अंबाद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड : कुकरेजा

- माझ्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड दरम्यान भाजपचे नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी यावर सांगितले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जो व्हिडीओ दाखविला तो आधीच पोलिसांकडे आहे. त्यात काहीही नवीन नाही. माझ्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तोडफोड करून पळून जात असताना आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना सर्व काही माहिती आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसnagpurनागपूर