काँग्रेस चुका सुधारणार
By Admin | Updated: June 10, 2014 01:08 IST2014-06-10T01:08:00+5:302014-06-10T01:08:00+5:30
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत असे चित्र नसेल. मतदारसंघातील परिस्थिती बघून विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष

काँग्रेस चुका सुधारणार
ठाकरे यांची विश्वास : राज्यात आघाडीच
नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत असे चित्र नसेल. मतदारसंघातील परिस्थिती बघून विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीत काही चुका झाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. चुका सुधारण्यासाठी वेळ आहे. समस्यांवर तातडीने निर्णय घ्यावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडली आहे. राज्याचा विकास कुणाच्या नेतृत्वात होऊ शकतो, याची जाण जनतेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे निवडणुका लढवितील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
पदवीधर मतदारसंघात बबनराव तायवाडे यांनी तयारी केली आहे. ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रपरिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, बबनराव तायवाडे, प्रकाश लोणारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एलबीटी रद्द !
राज्यातील व्यापार्यांचा विरोध विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी)रद्द करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला मीही उपस्थित होतो. याची घोषणा शासन करेल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
बंडखोरांवर कारवाई
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार्या पक्षातील बंडखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी गठित करण्यात आलेली राज्यस्तरीय समिती लवकरच निर्णय घेणार आल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.