शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द; पती शामकुमार होऊ शकतात उमेदवार

By कमलेश वानखेडे | Updated: March 28, 2024 13:50 IST

रामटेकची उमेदवारी रद्द होण्याचा धोका, निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव

नागपूर: रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरविले आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी बर्वे यांच्या वकिलांनी केली आहे. असे असले तरी काँग्रेसकडे अशा परिस्थितीत प्लॅन बी तयार असून रश्मी यांचे पती शामकुमार या जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बर्वे यांनी खोट्या व अवैध कागदपत्रांचा वापर केल्याची तक्रार करत आक्षेप घेतला होता. याप्रकरणी राज्य सरकारकडेही तक्रार करीत चौकशीची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने जिल्हा जात पडताळणी समितीला या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जात पडताळणी समितीने बर्वे यांना नोटीस बजावत कागदपत्र सादर करण्याची सूचना दिली होती. मात्र बर्वे यांनी कागदपत्र सादर न करता हा आपल्या विरोधात राजकीय डाव असल्याचे कारण देत मुदत वाढून मागितली होती. गुरुवारी सकाळी जिल्हा जात पडताळणी समितीने बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविले. या निर्णयाविरोधात बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु या गोंधळात काँग्रेसकडे वेगळा उमेदवार तयार असल्याने, काँग्रेससाठीही दिलासादायक बाब आहे.

  • पती शामकुमार होऊ शकतात उमेदवारजात पडताळणी प्रमाणपत्रावरून आपल्या अडचणी वाढू शकतात असे लक्षात येतात काँग्रेसने आपली रणनिती बदलली होती. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले आहे. श्यामकुमार यांनी काँग्रेसकडून स्वतंत्र अर्जही भरला आहे. त्यामुळे रश्मी यांचा अर्ज रद्द झाल्यास श्याम कुमार हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होतील.

 

  • छाननिकडे लक्ष, उमेदवारी रद्द होणारक्रांती लोकसभा मतदार संघासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्ज यांची गुरुवारी छाननी होणार आहे. बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याबाबत ची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाकडून तातडीने दिलासा मिळाला नाही तर छाननीत बर्वे यांचा अर्ज रद्द होऊ शकतो.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ramtek-pcरामटेकcongressकाँग्रेसCaste certificateजात प्रमाणपत्र