केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:24+5:302021-06-20T04:07:24+5:30

खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिनी संकल्प दिनाची सुरवात - सत्ता परिवर्तनाचा संकल्प बुटीबोरी : केंद्र सरकारचे कृषी कायदे ...

Congress protests against the central government | केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिनी संकल्प दिनाची सुरवात

- सत्ता परिवर्तनाचा संकल्प

बुटीबोरी : केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. बेरोजगारांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे देशात सत्ता परिवर्तनाचा संकल्प करीत शनिवारी जिल्हा काँग्रेसच्यावतीने ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली.

जिल्ह्यात उमरेड, काटोल, सावनेर, हिंगणा, रामटेक, कामठी आदी ठिकाणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. बुटीबोरी येथील दूरभाष चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण, सुधीर देवतळे, बाबू पठाण, सुधाकर कैकाडी, राजू गावंडे, युसूफ शेख, सुरेश जारोंडे, गजानन गावंडे, विनोद सोमनकर,श्रावण देवतळे आदी उपस्थित होते. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तक्षशिला वाघधरे यांच्या उपस्थित ग्रामीण भागात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

Web Title: Congress protests against the central government