शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 08:50 IST

लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करून निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर ( Marathi News ): पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील जागा कमी करून निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिला.  

मनुस्मृती दहन दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे आयोजित भारतीय स्त्री मुक्तिदिन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तीत आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले,  इंडिया आघाडीत आपण एकत्र लढलो तर स्वागतच आहे.  जो कोणी उमेदवार असेल तो जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी खूणगाठ मनाशी बांधा.  ज्या पक्षाला पाठिंबा दिला असेल,  त्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान ५०० मते मिळालीच पाहिजेत. यासाठी वाट्टेल ते करा. एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले. यावेळी स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर सुजात आंबेडकर उपस्थित होते.

देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे राजकारण

आरक्षणाच्या नावाखाली राज्यात  मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला जात आहे. सध्या देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे आणि ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरू आहे.  यातून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे.  ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ काही गोष्टी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या चुकल्या तशा नागपूरकरांच्याही चुकल्या आहेत. घाबरता कशाला, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी