काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा गोडवा

By Admin | Updated: January 14, 2017 02:09 IST2017-01-14T02:09:54+5:302017-01-14T02:09:54+5:30

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकले आहे. शुक्रवारी

Congress-NCP alliance's sweetness | काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा गोडवा

काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा गोडवा

राकाँ नेते पोहचले काँग्रेसकडे गजभियेंच्या नेतृत्वात चर्चा भाजपाला रोखण्यासाठी एकसंघ लढणार ?
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस नेत्यांकडे जाऊन आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादीने चर्चेत किती जागा हव्या याचा आकडा उघड केला नाही. नेत्यांमध्ये झालेल्या या चर्चेबाबत दोन्ही बाजूकडून अतिशय गुप्तता पाळण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. राज्यात आघाडी होईल की नाही हे स्पष्ट नसले तरी नागपुरात मात्र संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ‘गोडवा’ निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्थानिक पातळीवर आघाडीसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतलाच नाही, असा संदेश जाऊ नये याची काळजी घेत राष्ट्रवादीचे आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्त्वात अनिल अहीरकर, गंगाप्रसाद ग्वालबन्सी, विजय मोटघरे आदी राष्ट्रवादीचे नेते शुक्रवारी काँग्रेसचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या घरी पोहोचले.
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह आणखी काही पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आघाडीबाबत द्विपक्षीय चर्चा झाली. आपण एकत्र आलो तर मतविभागणी होणार नाही. विरोधकांची ताकद पाहता आपण वेगवेगळे लढणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडले. काँग्रेस नेत्यांनीही या बाबींना दुजोरा दिला.

गेल्यावेळी २८ आता किती ?
गेल्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी २८ वर निश्चित झाली होती. त्यापैकी ६ जागांवर राष्ट्रवादी जिंकली. यावेळी आघाडी झाली तरी पूर्वी एवढ्या जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी नाही. त्यामुळे राष्ट्रवादी नेमक्या किती जागा मागते हे प्रस्ताव आल्यावर स्पष्ट होईल.

संक्रांतीचा मुहूर्त
गेल्यावेळी संक्रांतीच्या मुहूर्तावर काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. १४ जानेवारी रोजी दोन्हीकडील नेत्यांनी अंतिम बैठक घेत आघाडीवर शिक्कामोर्तब केले होते. या वेळी संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आघाडीसाठी बोलणी सुरू झाली.

अशी झाली चर्चा
४दलित व मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आघाडी गरजेची आहे.
४दोन्ही पक्षाच्या जागा वाढतील, अशी बाजू राष्ट्रवादीने मांडली.
४आपले सरकार नाही, भाजप नागपुरात भक्कम आहे.
४भाजपच्या उमेदवारांना मोठी ‘रसद’ पुरविली जाणार आहे.

Web Title: Congress-NCP alliance's sweetness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.