शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची १९ ला मुंबईत बैठक

By कमलेश वानखेडे | Updated: July 10, 2024 18:57 IST

Nagpur : राज्यभरातून आलेल्या उमेदवारी अर्जांचा घेणार आढावा

नागपूर : लोकसभेच्या निकालानंतर प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. १९ जुलै रोजी मुंबईतील टिळक भवनात राज्यभरातील शहर व जिल्हाध्यक्षांसह प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून तीत विधानसभा निवडणुकीची रणणिती आखली जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून मागविण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचाही आढावा घेतला जाणार आहे.

ही बैठक १२ जुलैै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक असल्याने एक आठवडा पुढे ढकलण्यात आली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील उपस्थित राहतील. या बैठकीला जिल्हा प्रभारी व विविध आघाडी व सेलच्या प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष (प्रशासन व संघटन) नाना गावंडे यांनी कळविले आहे. 

प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून १० ऑगस्टपर्तंत उमेदवारी अर्ज मागविले होते. संबंधित अर्जांचा अहवालही शहर व जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांकडून प्रदेश काँग्रेसला सादर केला जाईल. आलेले व पुढील प्रक्रियेवरही बैठकीत चर्चा होऊन धोरण ठरविले जाईल. या बैठकीत मतदार नोंदणीबाबतचा आढावा तसेच संघटनात्मक आढावा देखील घेतला जाणार आहे. ज्या शहर व जिल्ह्यातील पक्षाची महत्वाची पदे रिक्त आहेत तेथे नियुक्ती करण्यावरही चर्चा होईल. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर