शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सदस्याच्या पतीची वर्गणी गाेळा करणाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 11:41 IST

ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हळदगाव येथे रविवारी घडली.

ठळक मुद्देहळदगाव येथील घटना

कुही (नागपूर) : ट्रकचालकांकडून वर्गणी गाेळा करीत असताना जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांचे पती संजय ठाकरे तिथे आले आणि त्यांनी वर्गणी गाेळा करणाऱ्यांवर ट्रकचालकांकडून वसूल करीत असल्याचा आराेप करीत जातीवाचक शिवीगाळ केली.

त्यातच त्यांनी इतरांना बाेलावून त्यांच्याकरवी वर्गणी गाेळा करणाऱ्याला मारहाण केल्याने प्रकरण पाेलिसांत पाेहाेचले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हळदगाव येथे रविवारी (दि. १०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

या संदर्भात शैलेश तुकाराम मोटघरे (३६, रा. हळदगाव, ता. उमरेड) यांनी कुही पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली आहे. ते त्यांच्या सहकाऱ्यांसह कार्यक्रमासाठी चांपा-हळदगाव मार्गावर धावणाऱ्या ट्रकचालकांकडून वर्गणी गाेळा करीत हाेते. संजय ठाकरे (रा. पाचगाव, ता. उमरेड) या मार्गावरून जात हाेते. त्यांनी शैलेश व त्यांच्या सहकाऱ्यांवर ट्रकचालकांकडून वसुली करीत असल्याचा आराेप करीत भांडायला सुरुवात केली. त्यांच्या सूचनेवरून त्यांचे दाेन नातेवाईक व सात-आठ जण तिथे आले.

त्या सर्वांनी काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केल्याने सहकारी पळून गेले व आपल्याला मारहाण केल्याचेही शैलेश माेटघरे यांनी पाेलीस तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा दखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रकांत मदने करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर