शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला दगाफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 11:37 IST

जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीनंतर एक नगर परिषद आणि एका नगर पंचायतीत निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी भाजपने सर्वाधिक जागा आपल्या झोळीत टाकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा नाव उंचावले.

ठळक मुद्दे रणनीती फसली शिवसेनेलाही अपेक्षित यश नाही, अपक्षांची उंच उडीनगरपरिषद/ नगर पंचायत निवडणूक निकाल

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीनंतर एक नगर परिषद आणि एका नगर पंचायतीत निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी भाजपने सर्वाधिक जागा आपल्या झोळीत टाकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा नाव उंचावले. दुसरीकडे काँग्रेसला पक्षांतर्गत राजकारण, दगाफटका यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा सहा महिन्यामध्ये दोन नगर पंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. तोपर्यंत किमान हा ‘खेळ’ थांबला नाही तर काँग्रेसच्या ‘हातात’ काहीच उरणार नाही.पारशिवनी नगर पंचायतसाठी काँग्रेसने जोरदार रणनीती तयार केली होती. मात्र त्यात आपल्याला उमदेवारी मिळणार नाही, यावरून खदखद निर्माण होऊन राजीनाम्यापर्यंत मजल मारली गेली. काहींनी भाजपमध्ये प्रवेश करीत तेथून उमेदवारी मिळविली आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडूनही आले. सोबतच काँग्रेसच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी वातावरण तयार केले. त्यामुळे मतदारांपर्यंत जो निरोप पोहोचायचा होता, तो पोहोचला. त्याचे फळ आता निवडणूक निकालातून स्पष्ट दिसत आहे.वास्तविक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. वानाडोंगरीत राष्ट्रवादी काँग्रेसला जनाधार असल्याचे दिसत असताना निवडणूक निकाल हा विरोधातच गेला. यामुळे आता ‘ईव्हीएम’वर दोषारोप केले जात आहे. वास्तविक मतदारांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमी पडला, अशीही सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुजबुज सुरू आहे. संपर्क अभियान, मतदार जोडो यासारखे अभियान या पक्षालाही राबविता आले असते. परंतु तसे काही झाले नाही. त्याचे परिणाम हे मतांतून स्पष्ट दिसले.शिवसेना पक्ष हा थोडा कमजोरच ठरला. वानाडोंगरीमध्ये शिवसैनिकांचा जोर असताना तेथे एकही उमेदवार निवडून न येणे ही धोक्याची घंटा आहे. पारशिवनीचे नगराध्यक्षपद आणि चार जागांवर सेनेला समाधान मानून घ्यावे लागले. पारशिवनीत माजी आ. जयस्वाल यांची ताकद कमी झाली का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्यास नवल नाही.एवढेच काय तर पारशिवनीच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपची चांगलीच पिछेहाट झाली. तिसऱ्या क्रमांकावर तेथे उमेदवार राहिला. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. अवघ्या २११ मतांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीतून काँग्रेसने खूप काही शिकण्यासारखे आहे. अन्यथा आगामी निवडणुकीतही हेच चित्र दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.येत्या सहा महिन्यातच महादुला आणि मौदा नगर पंचायतीत निवडणूक असून त्यासाठी आतापासून तयारी करणे गरजेचे झाले आहे.भाजपला पारशिवनी आणि वानाडोंगरी या दोन्ही ठिकाणी बहुमताचे पाठबळ मिळाले असले तरी पारशिवनी नगर पंचायत हातातून गेली, हे विशेष! त्यातून भाजप नेत्यांनी धडा घ्यावा.बसप आणि मनसेची मुसंडीवानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत बसपने भाजपला चांगलेच पछाडले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी मार्गात अडथळे बनण्याचे काम केले. बसपने चार ठिकाणी तिसऱ्या क्रमांकापर्यंतची मजल मारली. प्रभाग क्र. १० अ मध्ये अपक्ष उमेदवार तर १०-ब मध्ये मनसे उमेदवार द्वितीय स्थानी राहिला. या दोन्ही ठिकाणी राकाँ उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागून भाजपने विजयाचा मार्ग सुकर केला. यासोबतच प्रभाग क्र. २-अ, २ -ब, प्रभाग क्र. ४-अ आणि ब, प्रभाग क्र. ५-अ मध्येही अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारली. प्रभाग क्र. ५-ब मध्ये तर अपक्ष उमदेवाराने विजय साकारला.

 

टॅग्स :congressकाँग्रेस