नागपुरात काँग्रेस देवडिया भवनावर केले मध्यरात्री ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 20:34 IST2022-08-16T20:33:43+5:302022-08-16T20:34:11+5:30
Nagpur News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवडिया काँग्रेस भवन येथे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

नागपुरात काँग्रेस देवडिया भवनावर केले मध्यरात्री ध्वजारोहण
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवडिया काँग्रेस भवन येथे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाची ध्वनिफीत लावण्यात आली. देवडिया काँग्रेस भवनावर रोशनाई करण्यात आली होती. आजादी गौरव महोत्सव फटाके फोडून मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, माजी मंत्री अनीस अहमद, आ. विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, शेख हुसैन, अतुल कोटेचा, संदेश सिंगलकर, ॲड. नंदा पराते, नॅश अली आदी उपस्थित होते.