शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी काँग्रेसची नागपूर मनपावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 21:06 IST

मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमित होत नाही. मालमत्ता व पाणीपट्टीत झालेली प्रचंड दरवाढ या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देपाणीटंचाई दूर करून करवाढ रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमित होत नाही. मालमत्ता व पाणीपट्टीत झालेली प्रचंड दरवाढ या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.२४ बाय ७ योजनेंतर्गत घरोघरी नळ देण्याचे काम अजूनही ६० टक्के झालेले आहे. निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी तरतूद असतानाही ओसीडब्ल्यूला दंड आकारण्यात आलेला नाही. प्रक ल्पामुळे महापालिकेला ५८ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सायबरटेक कंपनीने मालमत्ता सर्वेक्षण चुकीचे केले. मालमत्ता व पाणी कराची करवाढ मागे घ्यावी. सफाईची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीकडून स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याने कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली.शिष्टमंडळात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर,प्रदेश प्रतिनिधी अ‍ॅड अभिजित वंजारी,नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अ‍ॅड. नंदा पराते, स्नेहा निकोसे,भावना लोणारे, जयंत लुटे, सुजाता कोंबाडे, ईरशाद अली, दर्शनी धवड, रश्मी धुर्वे, उज्ज्वला बनकर, मिलिंद सोनटक्के, हरीश ग्वालवंशी, हर्षला सांबळे, नेहा सेजुळ, अनिल पांडे, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, नितीश ग्वालवंशी, गुडडू तिवारी, दीपक वानखेडे, अ‍ॅड. अशोक यावले, राजेश कुंभलकर, अशरफ खान, प्रशांत कापसे, पंकज निघोट, पंकज थोरात, आकाश तायवाडे, राजेश पौनीकर, विवेक निकोसे, छाया सुखदेवे, रिचा जैन, विना बेलगे, अतीक मलीक, अब्दुल शकील, किशोर गीद, सुनिता ढोले, रवि गाडगे पाटील, अभिजित ठाकरे, संजना देशमुख, वसीम खान, स्नेहल दहीकर, तनवीर अहमद, राकेश पन्नासे, अ‍ॅड. अभय रणदिवे, स्नेहल दहीकर, गोपाल पट्टम, प्रसन्ना बोरकर, मामा गांवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन