पाटणसावंगी ग्रामपंचायतवर काँग्रेस गटाची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:09 IST2021-01-20T04:09:56+5:302021-01-20T04:09:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पाटणसावंगी : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आले. यात पाटणसावंगी (ता. सावनेर) ग्रामपंचायतच्या ...

पाटणसावंगी ग्रामपंचायतवर काँग्रेस गटाची सत्ता
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आले. यात पाटणसावंगी (ता. सावनेर) ग्रामपंचायतच्या एकूण १७ पैकी १५ जागांवर काँग्रेस समर्थित गटाने विजय संपादन केला असून, भाजप समर्थित गटाला केवळ दाेन जागांवर समाधान मानावे लागले.
पाटणसावंगी येथे एकूण सहा वाॅर्डांमधून १७ उमेदवार निवडून द्यावयाचे हाेते. येथील तीन उमेदवार अविराेध निवडून आल्याने उर्वरित १४ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. अविराेध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये वाॅर्ड क्रमांक-६ मधील काँग्रेस समर्थित गटाच्या राजश्री कश्यप व अनिता सिरसाट तसेच भाजप समर्थित गटाच्या इंदिरा काळे यांचा समावेश आहे. विजयी उमेदवारांमध्ये वाॅर्ड क्रमांक-१ मधील काँग्रेस समर्थित गटाचे रामेश्वर क्षीरसागर, सीमा केदार व हारून शेख, वाॅर्ड क्रमांक-२ मधील शिवशंकर चव्हाण, मनीषा पडोळे व रुपाली ठाकरे, वाॅर्ड क्रमांक-३ मधील राजेंद्र कडू, रोशनी ठाकरे व रूपाली कुमरे, वाॅर्ड क्रमांक-४ मधील प्रशांत बरडे, रोशन ढोक व सुनीता टेकाडे तसेच वाॅर्ड क्रमांक-५ मधील दीपक दलाल व भाजप समर्थित गटाच्या योगीता ठाकरे यांचा समावेश आहे.