शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कामठीत काँग्रेसचा पराभव ‘फिक्सिंग’चा परिणाम : सुरेश भोयर यांचा आरोप

By गणेश हुड | Updated: June 9, 2025 19:09 IST

Nagpur : ३५ हजार बोगस मतदारांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या कामठी विधानसभा निवडणुकीत तब्बल ३५ हजार ५३९ नव्या मतदारांची भर पडली असून, यातील बहुतांश नावं रहिवासी पुराव्याशिवाय आणि आधार कार्डाच्या आधारेच नोंदवण्यात आली, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषदेत केला.

भोयर यांनी सांगितले की, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी कामठी मतदारसंघात ४ लाख ६६ हजार २३१ मतदार होते, तर फक्त पाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत ही संख्या ५ लाख १ हजार ७७० झाली. विशेष म्हणजे, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर केवळ १५ दिवसांत १२ हजार नवीन मतदारांची ऑनलाईन नोंद करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मतदार नोंदणीचा हा विक्रम अभूतपूर्व आहे,” असे भोयर म्हणाले. राहुल गांधी यांनी भाजपने विधानसभा निवडणुकीत ‘फिक्सिंग’ केल्याचा जो आरोप केला, तो शंभर टक्के सत्य असल्याचे प्रतिपादन भोयर यांनी केले. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली गेली. पत्रकार परिषदेला जि.प.चे माजी सदस्य दिनेश ढोले, निरज लोणारे, शेख इर्शाद, सुमेत रंगारी, धीरज यादव, तुषार गेडाम, नरेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.

चार नगरपंचायतीत वाढले १६ हजारहून अधिक मतदार

  • बहादुरा-खरबी : ५,०८४
  • बेसा-पिपळा : ३,६६७
  • नरसाळा-हुडकेश्वर : ४,७१२
  • बिडगाव : २,९६१

 

काँग्रेसला मते मिळूनही पराभवलोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कामठीमध्ये १ लाख ३६ हजार मते मिळाली होती, आणि विधानसभेला देखील १ लाख ३४ हजार मते मिळूनही पराभव झाला, यामागे बोगस मतदारांचा स्पष्ट हस्तक्षेप असल्याचा दावा करण्यात आला.

सुरेश भोयर यांनी उपस्थित केलेले मुद्दे:

  • पाच ते सहा महिन्यांत कामठी मतदारसंघात ३५,५३९ मतदार कसे वाढले?
  • अंतिम मतदार यादीनंतर १२ हजार ऑनलाईन नोंदणी कशी झाली?
  • मतदार यादीत नाव समाविष्ट करताना रहिवासी पुरावा का मागितला नाही?
  • निवडणूक आयोग माहितीच्या अधिकारात माहिती का देत नाही?
  • भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांचे लॉगिन वापरून नोंदणी केली.
टॅग्स :nagpurनागपूरkamthi-acकामठीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024