शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्ते हुक्का पार्लरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:52 IST

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्शवत असाव्यात. कारण त्यांच्या व्यवहाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे समाजावर होत असतो. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे कार्यकर्त्यांसह दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची धाड : दहा अल्पवयीनही सापडले, पार्लरविरुद्ध चालान कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्शवत असाव्यात. कारण त्यांच्या व्यवहाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे समाजावर होत असतो. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे कार्यकर्त्यांसह दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे.डीसीपी नीलेश भरणे हे मंगळवारी नाईट राऊंडवर होते. त्यांना सदर छावणी येथील विंड अ‍ॅण्ड वूड्स रेस्टॉरंट आणि अंबाझरीतील हवेली रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर रात्री १ वाजतानंतरही सुरु असल्याची माहिती मिळाली. यानंतर डीसीपी भरणे यांनी सदर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. सदर पोलिसांनी राजनगर येथे संचालित रवींदर सिंह रंधकच्या पार्लवर धाड टाकली. तेव्हा दहा अल्पवयीन मुलेही सापडली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके हे आपले मित्र व कार्यकर्त्यांसोबत पार्लरमध्ये आढळून आले. तसेच अंबाझरी येथील हवेली रेस्ेॉरंटमधील हुक्का पार्लरविरुद्धही कारवाई करण्यात आली. सदर येथील रंधक आणि अंबाझरी येथील प्रेम जोरनकर व सुमीत गोपाळे यांच्याविरुद्ध ३३ आर डब्ल्यू ,१३५ मपोका अन्वये चालानची कारवाई करण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलांचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले.बॉक्स...लोकप्रतिनिधी काय प्रबोधन करणार ?हुक्का पार्लरमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असलेले काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासारखी व्यक्ती अशा ठिकाणी सापडणे हे कितपत योग्य आहे. लोकप्रतिनिधी यातून कोणते मार्गदर्शन करू इच्छितात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या घटनेनंतर काँग्रेस नेते शेळके यांच्यावर काय कारवाई करतात याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Policeपोलिसraidधाड