नागपुरात काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:41 IST2019-07-25T22:40:02+5:302019-07-25T22:41:41+5:30
न्यायालयाच्या बिगरजमानती वॉरंटची अंमलबजावणी न झाल्यामुळे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. शेळके यांना न्यायालयाने जामीन दिला. पोलीस भाजपाच्या दबावात काम करीत आहे. सरकारविरोधी आंदोलन केल्यामुळे त्रास दिला जात आहे, असा आरोप शेळके यांनी लावला.

नागपुरात काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाच्या बिगरजमानती वॉरंटची अंमलबजावणी न झाल्यामुळे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. शेळके यांना न्यायालयाने जामीन दिला. पोलीस भाजपाच्या दबावात काम करीत आहे. सरकारविरोधी आंदोलन केल्यामुळे त्रास दिला जात आहे, असा आरोप शेळके यांनी लावला.
सकाळी ११ वाजता शुक्रवारीस्थित कार्यालयात बसलो असताना पोलिसांनी वॉरंटची अंमलबजावणी न केल्याचे कारण देत मला अटक केली. २०१४ मध्ये मेडिकल चौकात पुतळा दहन केल्याच्या कारणावरून न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे, असे पोलीस म्हणाल्याचे यांनी सांगितले. शेळके यांना अजनी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. २०१४ साली अरविंद केजरीवाल विरोधात आंदोलन केले होते. आंदोलनांमुळे पोलीस ‘टार्गेट’ करीत असून जनतेचा आवाज उचलत राहू, असे शेळके म्हणाले.