सत्तेच्या बक्षिसावरून नागपुरात काँग्रेस-भाजप अध्यक्षांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 07:30 AM2021-09-04T07:30:00+5:302021-09-04T07:30:07+5:30

Nagpur News महापालिकेच्या निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी आतापासूनच शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी नागपूरकर सत्तेचे बक्षीस कुणाला देतील, यावरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यात जुंपली आहे.

The Congress-BJP president clashed over the prize of power | सत्तेच्या बक्षिसावरून नागपुरात काँग्रेस-भाजप अध्यक्षांमध्ये जुंपली

सत्तेच्या बक्षिसावरून नागपुरात काँग्रेस-भाजप अध्यक्षांमध्ये जुंपली

Next
ठळक मुद्देदटकेंच्या आक्रमतेवर ठाकरेही संतप्तपोपटपंची बंद करून हिशेब देण्याचा सल्ला


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी आतापासूनच शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी नागपूरकर सत्तेचे बक्षीस कुणाला देतील, यावरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्यात जुंपली आहे. हे दोन्ही नेते आमदार आहेत. शिवाय दोघेही माजी महापौर आहेत. महापालिकेच्या आखाड्यात आपले डाव फेकून एकमेकांना चित करण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत. (The Congress-BJP president clashed over the prize of power)

प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त सदस्यांची टीम सोबत घेत आ. ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. गेल्या १५ वर्षात महापालिकेत विविध घोटाळे झाले. विकास कामांच्या नुसत्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात काहीच साकारले नाही, अशी तोफ डागत भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच थेट लक्ष्य केले. ठाकरेंचा हा वार भाजपच्या जिव्हारी लागला. दुसऱ्याच दिवशी आ. प्रवीण दटके यांनी समोर येत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे आव्हान दिले. राजकारणासाठी आरोप जरूर करावेत, मात्र अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण शहराचा विकास का करू शकलो नाही, याचे आत्मपरीक्षणसुद्धा कराण्याचा सल्ला दटके यांनी प्रत्यक्षपणे ठाकरे यांना दिला.

दटके यांनी आक्रमक भूमिका घेताच ठाकरेही संतापले. भाजप नेत्यांनी पोपटपंची बंद करून काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे व वास्तविकता जनतेसमोर मांडावी, असे थेट आव्हान त्यांनी दटके यांना दिले. गडकरींच्या संकल्पनेतील एकाही प्रकल्पाला गती देण्यात दटके यांच्या नेतृत्वातील महापालिका कमी पडली. आता अपयशासाठी गडकरींची नाराजी ओढवून घ्यावी लागू नये म्हणून दटकेंची फटकेबाजी सुरू आहे, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला. महापौर म्हणून आपण महापालिका कशी चालविली हे भाजप नेत्यांना चांगलेच माहीत आहे. नवख्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीकाही त्यांनी भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांच्यावर केली.

ठाकरेंनी जारी केली २२ प्रश्नांची प्रश्नपत्रिका

- आ. विकास ठाकरे यांनी भाजपने शहर विकासाच्या केलेल्या विविध घोषणांचा संदर्भ देत २२ प्रश्नांची प्रश्नपत्रिकाच जारी केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे दटके यांनी जनतेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. लंडन स्ट्रीट योजना पूर्णत्वास का आली नाही, नागनदी प्रकल्प कुठे अडला, विधानसभानिहाय हॉस्पीिटल उभारण्याचे काय झाले, पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काय झाले, असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: The Congress-BJP president clashed over the prize of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.