शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

राहुल गांधींना जीवे मारण्याच्या धमकीवरून काँग्रेस आक्रमक, रस्ता रोको करीत निषेध

By कमलेश वानखेडे | Updated: September 13, 2024 17:27 IST

राहुल गांधी यांना धमकी : विकास ठाकरे, वंजारींसह पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना भाजपाचे माजी आमदार तरविंदरसिंग मारवा यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा निषेध करीत नागपूर शहर काँग्रेसने शुक्रवारी व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मारवा यांना अटक करण्याची मागणी करीत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. यावेळी शर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. ॲड. अभिजित वंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी आ. विकास ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर नेम साधला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरात प्रेमाचा संदेश देणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन भाजपची खरी मानसिकता समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागला तर देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाही यावेळी आ. ठाकरे यांनी दिला. आंदोलनादरम्यान आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, विशाल मुत्तेमवार, कमलेश समर्थ, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले.आंदोलनात अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव नितीन कुंभलकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नंदा पराते, प्रज्ञा बडवाईक, रेखा बाराहाते, रमन पैगवार, आकाश तायवाडे, प्रमोद सिंग ठाकूर, विलास बरडे, राम कळंबे, विवेक निकोसे, रवी गाडगे, श्रीकांत ढोलके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVikas Thakreविकास ठाकरेAbhijit Wanjariअभिजीत वंजारीnagpurनागपूर