काेराेना याेद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST2021-02-05T04:39:32+5:302021-02-05T04:39:32+5:30

वाडी : परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार झाला. काेराेनामुळे ३० नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला. या ...

Congratulations to Kareena Yadav | काेराेना याेद्ध्यांचा सत्कार

काेराेना याेद्ध्यांचा सत्कार

वाडी : परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार झाला. काेराेनामुळे ३० नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला. या परिस्थितीत तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सचिन हेमके, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुषमा धुर्वे, डाॅ. गणवीर, समीर चाैधरी, रेवतकर, अडले यांनी आराेग्य चमूला हाताशी घेत वाडी परिसरातील काेराेना आटाेक्यात आणला. याबद्दल नागपूर ग्रामीणचे तहसीलदार माेहन टिकले यांच्या हस्ते काेराेना याेद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डाॅ. सुषमा धुर्वे यांनी मनाेगत व्यक्त करताना महसूल विभाग, पंचायत समिती कार्यालय व वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले तसेच आराेग्य निरीक्षक धनंजय गाेतमारे यांच्या सहकार्यातून काेराेनाला राेखण्यात यश आले. हा विजय एकजुटीचा असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Web Title: Congratulations to Kareena Yadav