शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीशपदी फेरनिवड झाल्याबद्दल दलवीर भंडारी यांचे विधानसभेतर्फे अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:41 IST

हेग येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश पदी फेरनिवड झाल्याबद्दल भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काल विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या संदर्भात अभिनंदन प्रस्ताव मांडला.

नागपूर : हेग येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश पदी फेरनिवड झाल्याबद्दल भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काल विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या संदर्भात अभिनंदन प्रस्ताव मांडला.गेल्या महिन्यात भारताचा संयुक्त राष्ट्रात मोठा विजय झाला . दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश म्हणून निवडले गेले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या शेवटच्या जागेसाठी दलवीर भंडारी आणि ब्रिटनच्या उमेदवारात लढत होणार होती. मात्र अखेरच्या क्षणी ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतल्याने दलवीर भंडारींचा विजय झाला. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते. न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली. दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मतं मिळाली, तर सुरक्षा परिषदेच्या सर्वच्या सर्व 15 सदस्यांनीही त्यांनाच मत दिलं. याआधी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि ब्रिटनने निवडणूक पार पडण्याच्या काही क्षण आधीच आपली उमेदवारी मागे घेतली, ज्यामुळे दलवीर भंडारी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. दलवीर भंडारी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानव्यशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली. 1968 ते 1970 या काळात त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. शिकागो येथे काही काळ वकिलीही केली.अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी 1973 ते 1976 या काळात राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. 1977 साली ते दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी गेले. या क्षेत्रातील 23 वर्षांच्या अनुभवानंतर 1991 साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर 2005 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची 19 जून 2012 रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली. इंटरनॅशनल लॉ असोसिएशनच्या भारतीय शाखेचे कार्यकारी सदस्य म्हणून भंडारी यांची 1994 सालापासून निवड झाली. 2007 साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरdalveer bhandariदलवीर भंडारी