काँग्रेस कार्यकर्त्यांचे वासनिकांना साकडे

By Admin | Updated: August 12, 2014 01:15 IST2014-08-12T01:15:29+5:302014-08-12T01:15:29+5:30

अवघ्या चार महिन्यात मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात डॉ. अमोल देशमुख यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी,

Congratulating the Congress workers | काँग्रेस कार्यकर्त्यांचे वासनिकांना साकडे

काँग्रेस कार्यकर्त्यांचे वासनिकांना साकडे

अमोल देशमुख यांना उमेदवारी द्या : जागा जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा दावा
नागपूर : अवघ्या चार महिन्यात मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात डॉ. अमोल देशमुख यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खा. मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे.
रामटेकची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसकडे डॉ. अमोल देशमुख यांच्याशिवाय दुसरा प्रभावी उमेदवार नाही, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी वासनिकांकडे व्यक्त केला. डॉ. अमोल देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुकुल वासनिक यांचे सक्रियतेने काम सांभाळले. त्यावेळी ते काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवीन होते. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन वासनिकांसाठी मते मागितली. त्यावेळी त्यांना परिचय द्यावा लागला. परंतु, अल्पावधीतच त्यांचे काम तसेच त्यांच्या हर्ड फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणारी आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा, कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषद सर्कल मेळावे, गावभेटी लक्षात घेता मतदार व तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे डॉ. देशमुख यांची तरुण व सक्षम उमेदवार म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे.
दरम्यान, मुकुल वासनिक यांची डॉ. अमोल देशमुख यांनी भेट घेतली. त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अनेकांनी डॉ. अमोल देशमुख यांना रामटेक मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळावी, अशी विनंती वासनिकांकडे केली. यावेळी काँग्रेस पक्षाने डॉ. अमोल देशमुखांना उमेदवारी दिल्यास रामटेकचा गड जिंकण्याचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी वासनिकांकडे व्यक्त केला.
यावेळी रामटेक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण बन्सोड, प्रदेश काँग्रेस कमिटीचे संयोजक नामदेव कडुकर, रामटेक तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दीपक मोहोड, रवी चौरे, शिशुपाल यादव, माजी सभापती सुखराम लच्छोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कोमलचंद्र राऊत, कैलाश राऊत, माजी सभापती रेखा कडुकर, पंचायत समिती सदस्य महेश मडावी, गणेश राऊत, गंगाधर काकडे, रमेश चैधरी, वीरेंद्र गजभिये, श्रीपाद भालेराव, प्रमोद बरबटे, युवक काँग्रेसचे शहवाज सिद्दिकी, जितेंद्र गिरडकर, प्रमोद काकडे, नदीम जमा, सागर सायरे, अनिता लोहे, कैलाश निघोट, मनोज जयस्वाल, राजेंद्र बागडे, कलावती तिवारी, भगवान राऊत, प्रकाश ढोरे, देवाजी दोडके, ज्ञानेश्वर बडवाईक, पुरुषोत्तम धोटे, मधुकर बेले, सदाशिव बर्वे यांच्यासह रामटेक परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congratulating the Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.