शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिशा प्रकरणावरुन गोंधळ, आदित्य ठाकरेंनी सांगितली भावनिक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:14 IST

"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं

नागपूर  - येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दिशा सालियान प्रकरणावरुन ठाकरेंना लक्ष्य करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, याप्रकरणी नव्याने चौकशीची मागणीही केली. त्यानंतर, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यामुळे, आता पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्युप्रकरणाची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणेंनी याप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. आता, यावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार पलटवार केला आहे. तसेच, दिशा सालियान प्रकरणावर भावनिक प्रत्युत्तर दिलं.  

"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी राष्ट्रपतींना सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाबाबत लिहिलेलं आहे. काही आमदारांनी त्यांच्याबाबत वक्तव्य केलं त्यांचीही बदनामी करण्यात आली,'' असे भावनिक प्रत्युत्तर आदित्य यांनी दिले. तसेच, आपलं राजकारण एवढं घाणेरडं कधीच नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी विनंती करुन देखील, तसेच त्यांनी राष्ट्रपतींकडेही मागणी केली आहे की, आमची होणारी बदनामी थांबली नाहीतर आम्ही जगू शकणार नाही.", अशी आठवणही आदित्य यांनी करुन दिली. तसेच, खोके सरकार ३२ वर्षीय तरुणाला घाबरलं असल्याचंही ते म्हणाले. 

माझ्या बदनामीचे प्रयत्न सुरू - आदित्य

"एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे, आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. मी लहानपणापासून टीव्हीवर अधिवेशन पाहिलंय. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊ आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही." 

गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचे प्रयत्न

"यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यपाल हटाओ आम्ही जी सातत्याने मागणी करत आहोत, ज्या महाराष्ट्रद्वेशी राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुलेंचा अपमान केला. त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जे काही शोधायचंय ते शोधू द्यात. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की, NIT चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत," असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMLAआमदारSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत