शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन संघटनांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे नाभिक समाजात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 22:50 IST

दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची अपेक्षा असताना तीन संघटनांनी वेगवेगळे आंदोलन जाहीर के ले आहे. यामुळे नाभिक समाजातील सलून व्यावसायिक संभ्रमात पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची अपेक्षा असताना तीन संघटनांनी वेगवेगळे आंदोलन जाहीर के ले आहे. यामुळे नाभिक समाजातील सलून व्यावसायिक संभ्रमात पडला आहे.या तीनही मुख्य संघटनांची नावे महाराष्ट्र नाभिक महामंडळ अशीच आहेत. या नामसाधर्म्यामुळे आधीच समाज संभ्रमात आहे. एका संघटनेने आंदोलन जाहीर केले की अन्य संघटना त्यातून अंग काढतात. यामुळे समाजबांधव नेहमी गोंधळात असतात. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही असाच प्रकार घडल्याने समाजातील नेत्यांवर नाराजी व्यक्त होत आहे.रवी बेलपत्रे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेने ६ जूनला माझे दुकान माझी मागणी हे आंदोलन केले. मात्र त्यात अन्य दोन संघटनांचा सहभाग नव्हता. त्यानंतर कल्याण दळे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेने ९ जूनला धोपटी व अर्धनग्न आंदोलन जाहीर केले. तर,भगवान बिडवे हे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय नाभिक महासंघाने आणि दत्ता अनारसे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नाभिक महासंघाने १० जूनला निषेध आंदोलन जाहीर केले आहे.या तीनही संघटनांचे नाव एकच असले तरी अध्यक्ष मात्र वेगळे आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळातील मागण्याही जवळपास सारख्याच असल्या तरी आंदोलन मात्र वेगवेगळ्या दिवशी आहेत, यामुळे सलून दुकानदार व कारागीर संभ्रमात आहेत.कृती समितीचा प्रयोग अधांतरीया संकटाच्या काळात सलून व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नाभिक संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. यासाठी सर्वच संघटनांच्या अध्यक्षांनी सहमती दर्शविली. त्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही स्थापन झाला आहे. मात्र प्रत्यक्षात एकत्र न येता वेगवेगळे आंदोलन जाहीर झाले आहेत. परिणामत: कृती समितीमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या अनेक लहान संघटनांची प्रचंड गोची झाली. त्यामुळे या लहान संघटनांनीही आता आपले वेगळे आंदोलन जाहीर केले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर