कॉन्फिडन्स ग्रुपचा सीएनजी व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:13+5:302020-12-04T04:22:13+5:30
नागपूर : महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड (एमएनजीएल) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील सर्वात मोठ्या गॅस वितरण कंपनीपैकी एक असलेल्या भारतातील ...

कॉन्फिडन्स ग्रुपचा सीएनजी व
नागपूर : महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड (एमएनजीएल) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील सर्वात मोठ्या गॅस वितरण कंपनीपैकी एक असलेल्या भारतातील पहिल्या आणि मोबाईल रिफ्युएलिंग (एमआरयू) माध्यमातून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा पुरवठा करणाऱ्या अग्रणी कंपनीने पुणेकरिता कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडला पुरस्कृत केले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि एमओपीएनजीचे सचिव तरुण कपूर, ओएमसीएसचे अर्थात आयओसीएल, बीपीसीके, एचपीसीएल, गेल, आयजीएलचे तसेच सीजीडी कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. कॉन्फिडेन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड ही एलपीजी सिलिंडर उत्पादक, एलपीजी बॉटलिंग, ऑटो एलपीजी, पॅक्ड एलपीजी मार्केटिंग या क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी आहे. या प्रसंगी कॉन्फिडेन्स समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नितीन खारा म्हणाले, सीएनजी/एलएनजी ही आमच्यासाठी एक नैसर्गिक प्रगती आहे. अनेक दशकांचा पेट्रोलियम पदार्थ हाताळण्याचा आणि एलपीजी स्टेशन्सच्या कार्यान्वयाचा अनुभव आहे. देशातील पहिले एमआरयू यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. पुढे, एलएनजी, एलसीएनजी आणि सीएनजी स्टेशन्समध्ये जाण्यासह देशातील विविध शहरांमध्ये अनेक एमआरयू स्थापित करण्याची सीपीआयएलची योजना आहे. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि स्वच्छ व हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासह भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनास नवीन उंचीवर नेण्यासाठी कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड प्रतिबद्ध आणि आत्मविश्वासू आहे. कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड या आघाडीच्या कंपनीचा एलपीजी, सीएनजी, एलएनजीमध्ये व्यावसायिक सहभाग आहे. हा समूह सीएनजी सिलिंडर उत्पादन सुविधांद्वारे समर्थित एलपीजी सिलिंडर उत्पादन गटातील सर्वात मोठ्या क्षमतेपैकी एक सुसज्ज आहे. (वा.प्र.)