नागपुरात सरसकट लसीकरणाची मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:29+5:302021-03-17T04:08:29+5:30

नागपूर : शहरात रोज कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून पुढे काय परिस्थिती निर्माण होईल ...

Conduct a comprehensive vaccination campaign in Nagpur | नागपुरात सरसकट लसीकरणाची मोहीम राबवा

नागपुरात सरसकट लसीकरणाची मोहीम राबवा

नागपूर : शहरात रोज कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून पुढे काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नागपुरात लसीकरणाच्या केंद्रांची संख्या वाढवून, सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करण्याची, तसेच आजारी वरिष्ठ लोकांना घरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी जनमंचने केली आहे. काेराेना रुग्णांचा वाढता आलेख पाहता प्रशासनाने शहरात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. परंतु लॉकडाऊनचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाऊन, नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. सध्याच्या परिस्थितीत वय वर्षे साठ वरील तसेच वय वर्षे पंचेचाळीसच्या वयाेगटातील आजारी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र सध्याची स्फाेटक परिस्थिती बघता सरसकट सर्वांचे लसीकरण करावे, या मागणीचे निवेदन जनमंचतर्फे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, मनोहर रडके, महासचिव जावळकर, खरसणे, सावलकर, राम आखरे, शिंदे, टी. बी. जगताप लोखंडे यांनी दिले आहे.

Web Title: Conduct a comprehensive vaccination campaign in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.