आॅनलाईन लोकमतनागपूर : विधानसभेचे माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल त्यांना सोमवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शोकप्रस्ताव मांडला होता. दरम्यान एका विधानसभा सदस्यांच्या निधनानंतर तब्बल तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव मांडला जात असल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यासंबंधात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे असे होऊ नये म्हणून सदस्याच्या निधनानंतर १५ दिवसाच्या आत शासकीय प्रतिनिधीने संबंधितांच्या घरी जाऊन शासनाच्या वतीने शोक संवेदना व्यक्त करावी, जेणेकरून त्यांना शोकप्रस्ताव पाठविण्याची आठवण राहील, असे सांगितले.राज्याचे माजी मंत्री गोविंदराव सरनायक, विधानसभेचे माजी सदस्य राजीव राजळे, संपतराव पाटील, मुसा अली मोडक, रामभाऊ तुपे, डॉ. शंकरराव बोबडे, डॉ. कुसुमताई कोरपे या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.रामभाऊ तुपे यांचे निधन १६ आॅक्टोबर २०१४ रोजी झाले होते. परंतु त्यांच्या निधनाबाबतचा शोक प्रस्ताव तीन वर्षानंतर म्हणजे सोमवारी सभागृहात मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडत असताना स्वत: मुख्यमंत्र्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली व भविष्यात असे होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सदस्य अजित पवार, गणपतराव देशमुख, भास्कर जाधव, स्मिता कोल्हे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
नागपूर विधानसभेत निधनाच्या तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 17:55 IST
विधानसभेचे माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल त्यांना सोमवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शोकप्रस्ताव मांडला होता. दरम्यान एका विधानसभा सदस्यांच्या निधनानंतर तब्बल तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव मांडला जात असल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
नागपूर विधानसभेत निधनाच्या तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले निदर्शनासअध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश