रोहित पिल्लेवारला सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:07 IST2021-01-18T04:07:44+5:302021-01-18T04:07:44+5:30

आरोपीला व्यायाम करण्याचा छंद होता. तो स्टेरॉईड्स व प्रोटीन घेत होता. लॉकडाऊनमुळे जिम बंद झाल्यानंतर तो वेड्यासारखा वागायला लागला. ...

Conditional bail to Rohit Pillewar | रोहित पिल्लेवारला सशर्त जामीन

रोहित पिल्लेवारला सशर्त जामीन

आरोपीला व्यायाम करण्याचा छंद होता. तो स्टेरॉईड्स व प्रोटीन घेत होता. लॉकडाऊनमुळे जिम बंद झाल्यानंतर तो वेड्यासारखा वागायला लागला. दरम्यान, त्याने वडिलांना बेदम मारहाण केली. त्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला, अशी पोलीस तक्रार आहे. आरोपीतर्फे ॲड. मिर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.

-----------

हर्षल मेश्रामला हायकोर्टात दिलासा

नागपूर : खून प्रकरणातील आरोपी हर्षल देवराव मेश्रामला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे त्याला दिलासा मिळाला. तो वरंभा, (ता. कामठी) येथील रहिवासी आहे. मृताचे नाव धीरज साळवे होते. १ जून २०२० रोजी लकडगंज पोलिसांच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान ५ सप्टेंबर २०२० रोजी मेश्रामला अटक करण्यात आली होती. आरोपीतर्फे ॲड. अमित बंड यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Conditional bail to Rohit Pillewar